मराठमोळी अभिनेत्री आरती सोलंकी सध्या चर्चेत आली आहे. आरती सोलंकी चर्चेत येण्यामागचे कारण म्हणजे तिचे ट्रान्सफॉर्मेशन (Aarti Solanki Transformation). १३२ किलो वजन असलेल्या आरतीने तब्बल ५० किलो वजन कमी केले आहे. ट्रान्सफॉर्मेशननंतर आरती खूपच वेगळी दिसत आहे. तिला आता ओळखणं देखील कठीण झाले आहे. आधीपेक्षा आरती आता खूपच चांगली दिसत आहे.
आरतीने आपले वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आरतीची वेटलॉससाठी डाएट, नियमित व्यायाम केला. तिची ही वेटलॉस जर्नी अनेकांसाठी खूपच प्रेरणादायी आहे. नुकताच राजश्री मराठी या युट्यूब चॅनेलने नुकताच आरतीची मुलाखत घेतली. त्यावेळी तिने आपली संपूर्ण वेटलॉसची जर्नी आणि त्यासाठी घेतलेली मेहनत हा सर्व अनुभव शेअर केला आहे.
आरतीने सांगितले की, माझी वेटलॉसची जर्नी २०२१ पासून सुरू झाली होती. त्यावेळी माझं वजन १३२ किलो होतं. डाएटिशनशी बोलून वर्कआऊट करून ११९ किलोंवर वजन आणले. पण काही कारणांमुळे या वेटलॉस जर्नीला ब्रेक लागला. त्यानंतर एप्रिलपासून मी पुन्हा वजन कमी करायला सुरूवात केली. तेव्हा माझे वजन ११० किलो होतं. मी दिवसातले ७ ते ८ तास चालते. दिवसाला ४० हजार पावलं चालते. सकाळी नाष्टा आणि दुपारी एक भाकरी किंवा चपाती आणि भाजी एवढं खाते. त्यानंतर काही खात नाही. त्यानंतर भूख लागली तर सॅण्डविच किंवा भेळ खाते आणि रात्री झोपताना दूध पिते.'
आरती पुढे सांगते की, आता माझं वजन ८४ किलो आहे. मला ७० किलोपर्यंत वजन कमी करायचं आहे. वजन कमी केल्यापासून माझ्यात खूपच पॉझिटीव्हिटी आली आहे. माझ्या वाडीतील माणसं खूपच कौतुक करतात. आताचे आणि आधीचे फोटो पाहून मला खूपच फरक दिसतो. माझी पर्सनॅलिटी मला पूर्णपणे बदलायची आहे. कारण मी आधी वजनामुळे खूप ऐकून घेतलं आहे. मी खूप नकार पचवले आहेत. त्यामुळे मला आता बदलायचे आहे.'
तसंच, आठ-आठ चालल्यामुळे बऱ्याचदा माझे पाय खूप दुखतात. माझे पाय इतके दुखतात की मी रडत रडत झोपते. पण तरी देखील मी करते. आज रडेल, उद्या रडेल. पण कधीतरी हसीन स्वत:ला बघून', असं म्हणत आरतीने तिच्या ट्रान्सफॉर्मेशनवर आनंद व्यक्त केला आहे. त्याचसोबत तिने आपली पर्सनॅलिटी आणखी बदलण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील सांगितले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.