प्रसिद्ध बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्रीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 'नीरजा' फेम ईशा चोप्राचा (Eisha Chopra) एका ७० वर्षांच्या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी विनयभंग केला. या घटनेनंतर घाबरलेल्या ईशाने सोशल मीडियावर पोस्ट करत तिला आलेला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे.
या घटनेमुळे धक्का बसलेली ईशा १० दिवसांपासून व्यवस्थित झोपू देखील शकली नाही. सध्या ईशाने केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. ईशाची पोस्ट वाचून तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे.
ईशा चोप्राने 'नीरजा', 'व्हॉट द फॉक्स','द ग्रेट इंडियन डिसफंक्शनल फॅमिली', 'आउट ऑफ लव्ह' या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. १० दिवसांपूर्वी ईशासोबत एक धक्कादायक घटना घडली. सार्वजनिक ठिकाणी ईशावर एका ७० वर्षांच्या व्यक्तीने विनयभंग केला. या घटनेमुळेच गेल्या १० दिवसांपासून ईशा सोशल मीडियापासून दूर होती. पण अखेर तिने आपल्यासोबत घडलेला अनुभव इन्स्टाग्रामवर पोस्ट करत शेअर केला आहे.
ईशाने इन्स्टाग्रामवर १० पानांची भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने आपल्यासोबत घडलेल्या घटनेची डिटेल्समध्ये माहिती दिली आहे. ईशा चोप्राने आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, '१० दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी माझा विनयभंग केला. त्याने मला पकडले. त्याने छान कपडे घातले होते. तो सुशिक्षित दिसत होता आणि त्याचे वय सुमारे ७० वर्षे होते. तो माझ्याकडे आला आणि त्याने स्वतःची ओळख करून दिली. पुढे हात मिळवण्याच्या बहाण्याने. तो माझ्या शरीरावर वाटेल तिथे आणि चुकीच्या पद्धतीने स्पर्श करू लागला. यामुळे मी बरेच दिवस शॉकमध्ये होते.'
ईशाने आपल्या पोस्टमध्ये पुढे असे सांगितले की, 'हे सर्व काही इतक्या लवकर घडले की मी पूर्णपणे स्तब्ध झाले. काय करावे ते मला समजत नव्हते. या घटनेमुळे मी काही दिवसांपासून नीट झोपू शकले नाही. माझे हात अजूनही थरथर कापतात. असे वाटत होते की सर्व काही थांबले आहे. पण असे करून तो माणूस तेथून अगदी आरामात निघून गेला.'
ईशा चोप्राने या पोस्टमध्ये लहान असताना तिला अशाच प्रकारचा अनुभव आला होता त्याबद्दल देखील सांगितले आहे. ती म्हणाली की, 'मी ७ वर्षांची असताना पहिल्यांदाच अशा अत्याचाराचा सामना केला होता. मला त्या माणसाचा चेहरा अजूनही आठवतो.' दरम्यान, ईशाची ही पोस्ट वाचून तिच्या चाहत्यांना देखील धक्का बसला आहे. त्यांनी या पोस्टवर कमेंट्स करत ईशाला या घटनेतून सावरण्यासाठी मदत केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.