दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला तीन वर्ष झाले असले तरीही अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत. या प्रकरणात सर्वाधिक चर्चेत आली ती त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती. या आत्महत्याप्रकरणात अभिनेत्रीला अनेक आरोप, प्रत्यारोप आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. या प्रकरणात अभिनेत्रीची पोलिसांनी चौकशी देखील केली. दरम्यान, अभिनेत्रीला तीन वर्षांपूर्वी ज्या परिस्थितीचा सामना करावा लागत होता, तो अनुभव तिने शेअर केला.
नुकतंच अभिनेत्रीने ‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह २०२३’ मध्ये सुशांत प्रकरणाचा तिच्या आयुष्यावर काय परिणाम झाला, यावर तिने भाष्य केले आहे. सुशांतच्या निधनानंतर तिने कशापद्धतीने ट्रोलिंगचा सामना यावर तिने भाष्य केलेय. मुलाखतीत रिया म्हणाली, “आपलं आयुष्य एका वर्तुळासारखं आहे. सध्या मी माध्यमांसोबत बोलतेय, आयुष्य पुढे सरकतंय. मी ज्यावेळी ३१ वर्षांची होते, तेव्हा मला मी ८१ वर्षांची वृद्ध महिला आहे की काय असं वाटायचे. त्या काळात काही थेरपींची मदत घेऊन या सर्वांतून पुढे आली.”
रिया चक्रवर्ती पुढे मुलाखतीत म्हणाली, “ज्यावेळी मी लोकांच्या चेहऱ्याकडे पाहते, तेव्हा मला मी काहीतरी गुन्हा केला आहे, अशा नजरेनेच ते माझ्याकडे पाहतात. मी लोकांचे चेहरे वाचू शकते. अनेकजणं तर मला ‘चुडैल’ म्हणतात, पण ते नाव मला आवडतं. कोणीही किती नावं ठेवा मला काहीही फरक पडत नाही. काय माहित मला काळी जादू करता येत असेल. सुशांतने आत्महत्या का केली?, हे मला माहित नाही. पण तो त्यावेळी कोणत्या परिस्थितीचा सामना करत होता, हे मला माहीत आहे. मला एनसीबी आणि ड्रग्सबद्दल काहीही भाष्य करायचे नाही.”
२०२० मध्ये सुशांत सिंग राजपूतने त्याच्या राहत्या घरी गळफास घेत आपले आयुष्य संपवले होते. त्याच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्तीला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्यासोबतच तिला काही काळासाठी तुरुंगातही जावे लागले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.