Popular Indian Stars 2024 : यंदाच्या वर्षी कोणी केले प्रेक्षकांच्या मनावर राज्य, सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकार कोण? वाचा टॉप १० ची यादी

Most Popular Indian Stars List 2024 : यंदा 2024मध्ये कोणत्या कलाकराने प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने घायाळ करून सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकार म्हणून ओळख बनवली जाणून घेऊयात.
Most Popular Indian Stars  List 2024
Popular Indian Stars 2024SAAM TV
Published On

2024मध्ये सेलिब्रिटींनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. या वर्षात अनेक हिट चित्रपट झाले. यात अनेक मोठे कलाकार पाहायला मिळाले. प्रेक्षकांना रोमान्स, कॉमेडी आणि ॲक्शनची मेजवानी पाहायला मिळाली. प्रेक्षक अनेक सेलिब्रिटींचे चाहते असतात. त्यांच्या कामाचे कौतुक चाहते नेहमीच करतात. IMDbच्या रिपोर्टनुसार, टॉप 10 सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकार (Most Popular Indian Stars List 2024) जाणून घेऊयात. या यादीत पहिले नाव बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी हिचे आहे.

टॉप 10 सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकार

तृप्ती डिमरी

बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरीने खूप कमी वेळात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिचा 'भूल भुलैया ३' चित्रपट यावर्षी खूप गाजला. 'भूल भुलैया ३'हा हॉरर - कॉमेडी चित्रपट आहे.

दीपिका पादुकोण

अभिनेत्री दीपिका पादुकोणसाठी हे वर्ष खूप खास ठरले. या वर्षात दीपिका आई झाली. तसेच ती कल्की २८९८ एडी, सिंघम अगेन आणि फायटर या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तिचा कल्की २८९८ एडी आणि सिंघम अगेन चित्रपट खूप गाजले.

शाहरुख खान

बॉलिवूडचा किंग खान नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकतो. शाहरुख खानने आपल्या शैलीने चाहत्यांना भुरळ घातली आहे. आजवर त्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

प्रभास

प्रभास हा साउथचा सुपरस्टार आहे. यांनी अनेक हिट चित्रपट केले आहेत. प्रभासला 'पहिला पॅन-इंडियन सुपरस्टार' म्हणून गौरवले जाते. 2024 मधील 'कल्की २८९८ एडी' हा त्याचा चित्रपट खूप गाजला.

आलिया भट्ट

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा 'जिगरा' हा चित्रपट खूप गाजला. आलियाने साकारलेली प्रत्येक भूमिका सुपरहिट झाली आहे. तिला यासाठी अनेक वेळा गौरवण्यात देखील आले आहे.

विजय

अभिनेता विजय हा यावर्षी गोट (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली. त्याचा अभिनय चाहत्यांना खूप आवडला.

हृतिक रोशन

2024मध्ये अभिनेता हृतिक रोशन 'फायटर' चित्रपटातून चाहत्यांना भेटला. हृतिक रोशन अभिनयासोबत एक उत्तम डान्सर देखील आहे. 'फायटर'चित्रपटात हृतिक रोशनने दीपिका पादुकोणसोबत काम केले आहे.

ज्युनिअर एनटीआर

यावर्षी ज्युनिअर एनटीआरचा 'देवरा पार्ट १' खूप गाजला. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. या चित्रपटात ज्युनिअर एनटीआरसोबत अभिनेत्री जान्हवी कपूर दिसली.

ऐश्वर्या राय बच्चन

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यावर्षी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत राहिली. तिच्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.

समांथा रुथ प्रभू

साउथची सुपरस्टार म्हणून अभिनेत्री समांथा रुथ प्रभूला ओळखले जाते. यावर्षी समांथा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत राहिली. समांथा रुथ प्रभूच्या एक्स नवऱ्याने नागा चैतन्यने शोभिता धुलिपाला हिच्याशी लग्नगाठ बांधली.

Most Popular Indian Stars  List 2024
Blockbuster Movies 2024: यंदाचं वर्ष कुणी गाजवलं, कोणत्या चित्रपटाची छप्परफाड कमाई? यादी एका क्लिकवर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com