Rashmika Madanna Wedding: रश्मिकाने गुपचूप लग्न उरकलं? अभिनेत्रीने स्वत:च दिली कबुली

Rashmika Madanna Wedding Rumours: अभिनेत्रीने एका मुलाखतीत स्वत:च गुपचूप लग्न केल्याचा खुलासा केला आहे.
Rashmika Mandanna Reveals She Is Secretly Married
Rashmika Mandanna Reveals She Is Secretly MarriedInstagram @rashmika_mandanna
Published On: 

Rashmika Mandanna Reveals She Is Secretly Married: नॅशनल क्रश म्हणून सर्वत्र प्रचलित असलेल्या रश्मिका मंदान्नाचा सोशल मीडियावर खूपच मोठा चाहतावर्ग आहे. क्यूट स्माईलमुळे आणि उत्तम अभिनयामुळे ती करोडो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतेय.

अभिनेत्रीचा भारतातच नाही तर परदेशात देखील फार मोठा चाहतावर्ग आहे, नेहमीच क्यूट फोटोंसाठी चर्चेत राहणारी रश्मिका मात्र यावेळी एका वेगळ्याच कारणासाठी ती चर्चेत आली आहे. अनेकदा रश्मिकाचं आणि अभिनेता विजय देवरकोंडाचे रिलेशन असल्याच्या चर्चा झाल्या होत्या. सध्या सोशल मीडियावर रश्मिकाबाबतच्या एका नवीन माहितीची चर्चा होत आहे. अभिनेत्रीने स्वत:च गुपचूप लग्न केल्याचा खुलासा केला आहे.

Rashmika Mandanna Reveals She Is Secretly Married
Hemangi Kavi Share Post : देवळात जावंसं वाटतं जा, पण... मासिक पाळीविषयीची हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत

गेल्या काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदान्ना सलमानच्या ‘किसी की भाई किसी की जान’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. नेहमीच आपल्या अभिनयाकरिता आणि फॅशनसाठी चर्चेत राहणारी रश्मिका यावेळी एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे.

एका मुलाखतीत रश्मिकाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, मी आधीपासूनच विवाहित आहे. अभिनेत्रीच्या या उत्तराने उपस्थितांना काही वेळासाठी तरी का होईना आश्चर्याचा धक्का बसला.

अभिनेत्रीने पुढे मुलाखतीत सांगितले की, मी ॲनिमेटेड कॅरेक्टर ‘नारुतो’शी गुपचूप लग्न केलं आहे. अभिनेत्रीचे हे विधान ऐकून तेथील उपस्थित सर्वांनाच हसू फुटलेय.

Rashmika Mandanna Reveals She Is Secretly Married
Kiran Mane Post: ‘छे... नाही यार अक्ष्या... डोळे भरून येताहेत...’ किरण मानेची ‘फ्रेंडशिप डे’ निमित्त खास मित्रासाठी भावुक पोस्ट

यावेळी अभिनेत्रीने तिला ॲनिमेटेड कॅरेक्टर ‘हिनाटा’प्रमाणे बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. सोबतच तिच्या केसांचा रंग जांभळा व्हावा अशी ही इच्छा तिने व्यक्त केली. ‘ ‘नारुतो’कडे माझं हृदय आहे. ते माझे आवडतं पात्र आहे. मी त्याच्यासोबत लग्न केले आहे.’ असं ती एका मुलाखतीत म्हणाली. ‘नारुतो’ही जपानी लोकप्रिय ॲनिमेटेड सीरियल आहे. या मालिकेची जगभरातील चाहत्यांमध्ये फारच क्रेझ आहे. या सीरियलचे जगभरात लाखो चाहते आहेत. रश्मिकादेखील ‘नारुतो’ची चाहती आहे.

रश्मिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, रश्मिका ‘पुष्पा २’ पुर्वी ‘ॲनिमल’ या चित्रपटात झळकणार आहे. तिच्यासोबत चित्रपटात रणबीर कपूर आणि अनिल कपूरही दिसणार असून चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा करणार आहेत. तर, ‘पुष्पा २’मध्ये अल्लू अर्जूनसोबत रश्मिका झळकणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com