The Traitors Karan Johar: बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर आता एका नव्या रिअॅलिटी शोच्या सूत्रसंचालनात दिसणार आहेत. 'द ट्रेटर्स' या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या शोच्या भारतीय एडिशनची घोषणा करण्यात आली असून, हा शो १२ जून २०२५ पासून Amazon Prime Video वर प्रसारित होणार आहे. या शोमध्ये विश्वासघात, रणनीती आणि मनोवैज्ञानिक खेळ यांचा थरार अनुभवता येणार आहे.
'द ट्रेटर्स' हा शो IDTV च्या BAFTA आणि Emmy पुरस्कार विजेत्या फॉरमॅटवर आधारित आहे. या शोमध्ये विविध क्षेत्रातील २० प्रसिद्ध सेलिब्रिटी सहभागी होणार असून, ते एकमेकांवर विश्वास ठेवत मोठ्या रोख बक्षीसासाठी स्पर्धा करतील. या शोची निर्मिती BBC Studios India Productions आणि All3Media International यांच्या सहकार्याने करण्यात आली आहे. प्रत्येक गुरुवारी या शोचा नवीन भाग प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होईल.
करण जोहरने नुकत्याच प्रदर्शित केलेल्या टीझरमध्ये शोबद्दल काही हिंट दिल्या आहेत. त्यात त्यांनी "इथे असे बंडखोर असतील जे लहान असूनही मोठ्या गोष्टी बोलतात", "असे लोक जे त्यांच्या आऊटफिटवर अवलंबून असतात", आणि "जे मास्कच्या आड वादग्रस्त वादापासून लपवतात" अशा वाक्यांद्वारे स्पार्धाकांची हिंट दिली आहे. या टीझरमध्ये अपूर्वा मुखीजा, एल्विश यादव, उर्फी जावेद आणि राज कुंद्रा यांच्यासारख्या सेलिब्रिटींच्या सहभागाची झलक पाहायला मिळते.
'द ट्रेटर्स' हा शो प्राइम व्हिडिओच्या अनस्क्रिप्टेड कंटेंटचा एक भाग आहे. या शोमध्ये ड्रामा आणि भांडणांचा समावेश आहे. करण जोहरच्या ग्लॅमरमुळे हा शो प्रेक्षकांसाठी एक सरप्राइजिंग अनुभव मिळणार आहे.