The Traitors 2 Winner: शेवटच्या क्षणी पलटला खेळ! क्रिस्टल-रिदा ठरल्या 'द ट्रेटर्स 2'च्या विजेत्या; ६६ लाखांवर मिळवलं बक्षीस

The Traitors 2 Winner: 'द ट्रेटर्स 2' मध्ये क्रिस्टल डिसूझा आणि रिदा थराना यांनी विजेतेपद पटकावले. दोघींनी ६६ लाखांची बक्षिसाची रक्कम जिंकत अखेरच्या क्षणी क्रिस्टलने मास्टरस्ट्रोक खेळला.
The Traitors 2 Winner
The Traitors 2 WinnerSaam Tv
Published On

The Traitors 2 Winner: 'द ट्रेटर्स च्या दुसऱ्या पर्वाचा थरारक ग्रँड फिनाले अखेर पार पडला असून क्रिस्टल डिसूझा आणि रिदा थराना यांनी विजेतेपदावर नाव कोरले आहे. करण जोहरच्या होस्टिंगमुळे चर्चेत राहिलेल्या या रिअॅलिटी शोमध्ये अखेर दोन 'ट्रेटर्स'ने बाजी मारली. दोघींनी मिळून तब्बल ६६ लाख रुपयांची बक्षिसाची रक्कम जिंकली.

या सीझनमध्ये सुरुवातीपासूनच विश्वास, संशय, मैत्री आणि रणनीतीचा खेळ पाहायला मिळाला. क्रिस्टल डिसूझा ही सुरुवातीपासूनच एक मजबूत आणि हुशार खेळाडू म्हणून समोर आली. तिच्या रणनीतीमुळे अनेक वेळा ट्रेटर्सना मोठा फायदा झाला. विशेष म्हणजे रिदा थराना सुरुवातीला ‘इनोसंट’ म्हणून या खेळात सहभागी झाली होती. मात्र, पुढे क्रिस्टलने तिला ट्रेटर म्हणून आपल्या गटात सामील करून घेतले. त्यानंतर दोघींनी एकत्रितपणे अत्यंत सावधपणे गेम खेळला.

The Traitors 2 Winner
Singer Death: प्रसिद्ध गायकाचा वयाच्या ३५व्या वर्षी मृत्यू ; घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

ग्रँड फिनालेपूर्वी मल्लिका शेरावतला ट्रेटर्सनी ‘संपवल्याने अंतिम टप्प्यात दलिप ताहिल, साहिल सलाथिया, शालिनी पासी, रिदा आणि क्रिस्टल हे स्पर्धक उरले होते. अंतिम मिशनमध्ये स्पर्धकांना उंटांवर ठेवलेल्या बॅगमधून सोन्याच्या बार शोधायचे होते. या टास्कमधून तब्बल १७ लाख ६० हजार रुपये कमाई झाली आणि बक्षिसाची एकूण रक्कम ६६ लाखांवर पोहोचली.

The Traitors 2 Winner
Shiv Thackeray: टीव्हीनंतर आता मोठ्या पडद्यावर शिव ठाकरेची एंट्री; 'रक्तनीती'मधून करणार मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री

यानंतर ‘सर्कल ऑफ शक’मध्ये खेळ खेळण्यात आला. क्रिस्टलने आपल्या रणनीतीचा वापर करत दलिप ताहिलला बाहेरचा रस्ता दाखवला. अंतिम चारमध्ये क्रिस्टल, रिदा, शालिनी आणि साहिल पोहोचले. पुढील फेरीत सर्वांना ‘ट्रस्ट’ किंवा ‘शक’ यापैकी एक पर्याय निवडायचा होता. पहिल्या फेरीत सर्वांनी ‘शक’ निवडले त्यानंतर वोटींग झाली आणि साहिल सलाथिया गेममधून बाहेर पडला.

अखेरच्या फेरीत क्रिस्टलने पुन्हा एकदा आपला मास्टरस्ट्रोक खेळला. तिने 'ट्रस्ट' निवडला आणि रिदानेही तिची साथ दिली. मात्र शालिनीने 'शक' निवडल्याने पुन्हा वोटींगची वेळ आली. शालिनीने रिदाविरोधात मतदान केले, तर क्रिस्टल आणि रिदाने एकत्र येत शालिनीला बाहेर केले. यानंतर अंतिम दोन खेळाडू म्हणून क्रिस्टल आणि रिदा उरल्या आणि दोघींना संयुक्त विजेते घोषित करण्यात आले. क्रिस्टलने रिदाला वाचवून एकट्याने विजेतेपद मिळवण्याची संधी सोडली आणि दोघींनी मिळून ट्रॉफी जिंकली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com