The Bads Of Bollywood Review: किंग खानच्या मुलाची 'बॅड्स ऑफ बॉलीवूड' वेब सिरीज पास की फेल? प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यूव

The Bads Of Bollywood Public Review: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. गुरुवारी, आर्यन खान दिग्दर्शित "बॅड्स ऑफ बॉलीवूड" ही मालिका ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली.
Bads Of Bollywood
Bads Of Bollywood Saam Tv
Published On

The Bads Of Bollywood Public Review: "बॅड्स ऑफ बॉलीवूड" या ओटीटी वेब सिरीजद्वारे आर्यन खानने दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आहे. प्रसिद्ध स्टार्सचे कॅमिओ आणि बॉलिवूडमधील सिक्रेट्सची झलक या वेब सिरीजमधून दिसून येते. या वेब सिरीजबद्दल नेटिझन्सच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरही आल्या आहेत. ही वेब सिरीज नेटिझन्सना आवडली का? जाणून घेऊयात.

आर्यनच्या दिग्दर्शन प्रेक्षकांना आवडले

ट्विटरवरील एका नेटकऱ्याने "बॅड्स ऑफ बॉलीवूड" या वेब सिरीजबद्दल लिहिले, "या वेब सिरीजचे दिग्दर्शन माझ्या अपेक्षांपेक्षा जास्त आहे. आर्यन खानने उत्तम काम केले आहे." दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, "किती उत्तम वेब सिरीज आहे." त्याचप्रमाणे, दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, "वेब सिरीजचे पहिले ३० मिनिटे मनोरंजक आहेत. विनोद देखील उत्तम प्रकारे मांडले आहेत."

Bads Of Bollywood
शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या 60 कोटी फसवणूक प्रकरणात बॉलीवूड सेलिब्रिटींची होणार चौकशी; 'या' अभिनेत्रींना पाठवली नोटीस

बॉबी देओल व्यतिरिक्त इतर कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक

एका नेटकऱ्याने लिहीले की, "समीक्षक या वेब सिरीजला गेम चेंजर म्हणत आहेत. ही वेब सिरीज बॉलिवूड चाहत्यांनी आवर्जून पाहावी अशी आहे." दुसऱ्या नेटकऱ्याने असेही लिहीले की, "बॉबी देओल आणि लक्ष्य वगळता मालिकेतील सर्व कलाकारांचा अभिनय उत्तम केले आहे. एका नवीन दिग्दर्शकाने या कलाकारांकडून उत्तम काम करुन घेतले आहे.

Bads Of Bollywood
Jolly LLB 3 BO Collection: अक्षय कुमारचा चित्रपट ब्लॉकबस्टर ओपनिंगसाठी सज्ज; 'जॉली एलएलबी 3' करणार का रेकॉर्ड ब्रेक कमाई?

या वेब सिरीजची कथा काय आहे?

आर्यन खान दिग्दर्शित "द बॅड्स ऑफ बॉलीवूड" या वेब सिरीजमध्ये लक्ष्य हा नायक आसमानची भूमिका साकारतो. बॉबी देओल एका ग्रे भूमिकेत आहे. मोना सिंग, राघव जुयाल, गौतमी कपूर आणि मनोज पाहवा यांसारखे कलाकार देखील या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. . "द बॅड्स ऑफ बॉलीवूड" ही मालिका गौरी खान यांनी निर्मित केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com