Tharla Tar Mag Promo: 'मला तुम्हाला प्रपोज करायचं आहे...'; अर्जुनने सायलीसमोर ठेवला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा नवा प्रस्ताव; नवीन प्रोमो आऊट

Star Pravah's Tharla Tar Mag Serial Latest Promo: 'ठरलं तर मग' या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. मालिकेत सायली अर्जुनच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होणार आहे. म्हणजेच सायली अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आता संपणार आहे.
Tharla Tar Mag Promo: 'मला तुम्हाला प्रपोज करायचं आहे...'; अर्जुनने सायलीसमोर ठेवला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा नवा प्रस्ताव; नवीन प्रोमो आऊट
Tharla Tar Mag New Promo: Arjun Propose To Sayali With New Idea Of Renew Contract Marriage Till CaseSaam Tv

'ठरलं तर मग' या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. मालिकेत सायली अर्जुनच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होणार आहे. म्हणजेच सायली अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आता संपणार आहे. त्यामुळे सायली अर्जुनचे घर सोडून जाणार आहे. परंतु आता सायली अर्जुनमध्ये नवीन कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. मालिकेचा नवीन प्रोमो सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

Tharla Tar Mag Promo: 'मला तुम्हाला प्रपोज करायचं आहे...'; अर्जुनने सायलीसमोर ठेवला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा नवा प्रस्ताव; नवीन प्रोमो आऊट
Cannes Film Festival 2024 : "आज तू हवी होतीस...", कान्समध्ये पोहचलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीची आईसाठी भावनिक पोस्ट

मालिकेच्या नव्या प्रोमोत सायली अर्जुनमध्ये नवीन कॉन्ट्रॅक्ट होताना दिसत आहे. सायली आता अर्जुनचं घर सोडून जाणार आहे. परंतु त्याआधीच अर्जुन सायलीसमोर एक प्रस्ताव ठेवतो.

अर्जुन सायलीला म्हणतो की, मी तुम्हाला प्रपोज करणार आहे. त्यावर सायली अर्जुनकडे बघते. त्यावर अर्जुन म्हणतो, म्हणजे तुमच्यासमोर एक आयडिया प्रपोज करायचीये. आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपलं तर मधुभाऊंची केस जिंकेपर्यंत तुम्ही इथेच राहावं असं मला वाटतं. त्यावर सायली म्हणते की, हो सर मला मान्य आहे. त्यामुळे आता सायली- अर्जुन मधुभाऊंची केस संपेपर्यंत एकत्रच राहणार आहे.

Tharla Tar Mag Promo: 'मला तुम्हाला प्रपोज करायचं आहे...'; अर्जुनने सायलीसमोर ठेवला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा नवा प्रस्ताव; नवीन प्रोमो आऊट
लक्झरीयस कार आणि अलिशान घर; इतक्या कोटींचा मालक आहे Jr NTR

मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अनेक ट्विस्ट येताना दिसत आहे. मालिकेत सायली अर्जुन यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. परंतु काही गैरसमजांमुळे ते आपल्या प्रेमाची कबुली देत नाही. परंतु आता या दोघांचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अजून काही दिवस टिकणार असल्याने ते प्रेमाची कबुली देणार का? त्यांचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज खऱ्या लग्नात रुपांतरित होणार का? सुभेदार कुटुंबियांना कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल समजणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहे. मालिकेचे पुढील काही भाग खूपच रंजक असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com