Tharala Tar Mag : अमित भानुशालीची 'ठरलं तर मग' मधून एक्झिट? नवीन प्रोमो पाहून प्रेक्षक गोंधळले, थेट अर्जुनवरच होतो जीवघेणा हल्ला | VIDEO

Tharala Tar Mag Marathi Serial Update : 'ठरलं तर मग' मालिकेत धक्कादायक वळण आले आहे. सायलीची तुरुंगातून सुटका झाल्यावर अर्जुनवर जीवघेणा हल्ला होतो. या प्रोमोमुळे सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.
Tharala Tar Mag Marathi Serial Update
Tharala Tar MagSAAM TV
Published On
Summary

सायलीची तुरुंगातून सुटका

अर्जुनवर होणार जीवघेणा हल्ला

'ठरलं तर मग' मालिकेत मोठा ट्विस्ट

सुरुवातीपासून प्रेक्षकांची आवडती असलेली 'ठरलं तर मग' मालिका आता धक्कादायक वळणावर येऊन ठेपली आहे. भर डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात सायलीला आश्रमातल्या मुलींची तस्करी करण्याच्या आरोपाखाली अटक होते, यामुळे सुभेदारांना मोठा धक्का बसतो. प्रियाचा प्लान यशस्वी होण्याच्या मार्गावर असताना अर्जुन कोर्टात अशीकाही खेळी खेळतो की, सायलीची तुरुंगातून निर्दोष सुटका होते. मात्र आता प्रिया सायली-अर्जुन विरोधात जीवघेणा कट रचते. ज्याचा प्रोमो समोर आला आहे.

नवीन प्रोमोत नेमकं काय?

'ठरलं तर मग' मालिकेच्या नवीन प्रोमोने सोशल मीडियावर वादळ आले आहे. तुम्ही पाहू शकता की, सायली आणि घरातील इतर महिला देवीची आरती करताना दिसतात. तेव्हा सायली बोलते की, "देवी आई यांना मानसी लवकर सापडू दे आणि दोघे लवकर घरी परत येऊ दे..." तेवढ्यात प्रोमोच्या दुसऱ्या भागात काही गुंड अर्जुनवर हल्ला करताना दिसतात. अर्जुनवर चाकूने वार केला जातो आणि तो 'बायको' असे बोलून खाली कोसळतो. तेवढ्यात देवी जवळची कुंकवाची वाटी उचलताना सायलीच्या हातून ती पडते आणि अशुभ संकेत मिळतो. ते पाहून सायलीला मोठा धक्का बसतो. तेवढ्यात प्रिया तुरुंगात "राम नाम सत्य है..." बोलताना दिसते. हा हल्ला प्रियाने अर्जुनवर घडवून आणल्याचे स्पष्ट होते.

प्रेक्षकांना पडले अनेक प्रश्न

'ठरलं तर मग' मालिकेचा हा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच प्रोमो पाहून प्रेक्षकांना अनेक प्रश्न पडले आहे. काहींना वाटत आहे की, मालिकेत अर्जुनची भूमिका साकारणारा मराठी अभिनेता अमित भानुशाली मालिका सोडणार आहे, तर काही नेटकरी बोलतात की, अर्जुन हल्ल्यातून सावरून प्रियाचे कट कारस्थान उघड करणार. तर काही लोक म्हणतात की, अर्जुन हे पात्र मालिकेत संपून, नवीन हिरोची एन्ट्री होणार. आता मालिकेत नेमकं काय घडणार हे येणाऱ्या भागांमध्येच समजेल. मात्र अद्याप अभिनेता अमित भानुशाली मालिका सोडणार असल्याचे कोणतेही अधिकृत विधान समोर आले नाही.

Tharala Tar Mag Marathi Serial Update
Antara Banerjee : "ती मी नव्हेच..."; RPF कर्मचाऱ्यावर हल्ल्याप्रकरणी अभिनेत्री अंतरा बॅनर्जीचं स्पष्टीकरण

'ठरलं तर मग' चे येणार भाग खूपच मनोरंजक असणार आहे. अर्जुन खरंच मरणार की सायली आपल्या नवऱ्याचा जीव वाचवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रोमो व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिण्यात आले की, प्रियाचा हा जीवघेणा डाव बेतेल का अर्जुनच्या जीवावर...? 'ठरलं तर मग' ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर रात्री ८.३० वाजता पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com