Jui Gadkari : मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरी सध्या तिच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. ‘स्टार प्रवाह’वरील ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेत सायलीची भूमिका साकारत जुईने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात आपली खास ओळख निर्माण केली आहे. जुई सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. ती नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत शूटिंग आणि वैयक्तिक आयुष्यातील काही अपडेट्स शेअर करत असते. मात्र, तिच्या नुकत्याच केलेल्या एका पोस्टने चाहत्यांची चिंता वाढवली आहे.
जुई गडकरीने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने, “सुटका झाली... मोठा अनर्थ टळला... कॅप्टन देव आहे! कॅप्टनचे आभार...” असं लिहिलं आहे. जुईच्या या पोस्टवरून तिच्या विमान प्रवासादरम्यान काहीतरी धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर येत आहे. मात्र, या घटनेबाबत जुईने अद्याप सविस्तर माहिती दिलेली नाही.
याआधी जुईने विमानतळावरून काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडिया स्टोरीवर शेअर केले होते. ती विमानाने अमरावतीला जात असल्याचं तिच्या पोस्टमधून दिसून आलं होतं. विमानतळावर नाश्ता करतानाचा फोटोही तिने चाहत्यांसोबत शेअर केला होता. त्यानंतर तिने ‘स्टार प्रवाह’वरील इतर मालिकांच्या अभिनेत्रींसोबतचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोत जुईसोबत अभिनेत्री एतेशा संझगिरी आणि माधवी निमकर दिसत आहेत.
‘स्टार प्रवाह’कडून विविध शहरांमध्ये अनेकदा कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन केलं जातं. या कार्यक्रमांना वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांचे कलाकारही आवर्जून उपस्थित राहतात. त्याच कार्यक्रमासाठी जुई गडकरी, एतेशा संझगिरी आणि माधवी निमकर या अमरावतीला गेल्या असल्याचं दिसत आहे.
दरम्यान, जुईच्या पोस्टमधील “मोठा अनर्थ टळला” या वाक्यामुळे नेमकं विमानात काय घडलं, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. विमान प्रवासादरम्यान तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असावी, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
जुईच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी तिच्या प्रकृतीची आणि सुरक्षिततेची चिंता व्यक्त केली आहे. अनेकजण सोशल मीडियावर कमेंट्सच्या माध्यमातून अभिनेत्री सुखरूप असल्याबद्दल समाधान व्यक्त करत आहेत. आता जुई स्वतः या घटनेबाबत नेमकं
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.