Thalapathy Vijay New Film: Thalapathy 68 ची घोषणा! पुन्हा विजयला सामना करावा लागणार ‘या’ खलनायकाचा, चाहत्यांची उत्सुकता वाढली

Thalapathy 68 Teaser Relase: ‘वारिसू’ नंतर थलपती विजयचा एक नवा कोरा चित्रपट येत असून नुकताच त्याने सोशल मीडियावरून त्याची घोषणा केली.
Thalapathy Vijay New Movie Teaser
Thalapathy Vijay New Movie TeaserInstagram/ @actorvijay

Thalpati 68 Film Announce: सध्या भारतीय चित्रपटसृष्टीवर दाक्षिणात्य चित्रपटांचाच सर्वाधिक बोलबाला आहे. अनेक दाक्षिणात्य चित्रपटांनी छप्पर फाडके कमाई करत आपले नाव शिरपेचात कायम ठेवले. साऊथमधील अनेक कलाकार आपल्या चित्रपटांमुळे बरेच चर्चेत आहेत. अशातच सध्या थलपती विजय देखील बराच चर्चेत आला आहे. ॲक्शन, इमोशन, कॉमेडी आणि रोमान्स अशा धाटणीच्या चित्रपटातून प्रेक्षकांचे मन जिंकले. नुकतेच त्याने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.

Thalapathy Vijay New Movie Teaser
Rita Reporter Comeback: 'तारक मेहता'मधील रिटा रिपोर्टर पुन्हा येतेय; ४ वर्षेनंतर या मालिकेत करतेय कमबॅक

अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या चित्रपटाची घोषणा थलपतीने केल्यामुळे सर्वांनाच त्याच्या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. विजयने त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा एका मनोरंजक व्हिडीओने केली असून सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. सुपरस्टार विजयच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘थलपति 68’ (Thalapathy 68) असे आहे. व्यंकट प्रभू निर्मित चित्रपटात पहिल्यांदाच व्यंकट आणि थलपथी ही जोडी एकत्र काम करणार आहे.

चित्रपटाची घोषणा करताना थलपती विजय म्हणतो, “तो वेंकट प्रभू यांच्यासोबत त्यांचा पुढील प्रकल्प सुरू करणार आहे.” निर्मात्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, “कास्ट आणि क्रू, शीर्षक घोषणा आणि अन्य अपडेट प्रोडक्शन टीमद्वारे अधिकृतपणे प्रसिद्ध केली जातील.” असे म्हणत त्यांनी चाहत्यांना माहिती दिली आहे.

Thalapathy Vijay New Movie Teaser
Raj of Raj-Koti Passes Away: प्रसिद्ध दाक्षिणात्य संगीतकाराचे निधन; सिनेसृष्टीवर पसरली शोककळा....

कल्पना एस अघोराम यांच्या AGS एंटरटेन्मेंट ने ‘थलपति 68’ ची निर्मिती केली. चित्रपटाला संगीत युवा शंकर यांनी दिलं असून विजय थलपतीने त्याच्या ट्विटर हँडलवरून या चित्रपटाच्या घोषणाचा व्हिडीओही शेअर केला आहे. तो कॅप्शनमध्ये म्हणतो, “बर्‍याच दिवसांनी विजयसोबत एकत्र काम करण्याचा मला आनंद आहे.” ‘थलपति 68’ हा AGS एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली निर्मित 25 वा चित्रपट आहे. 2019 च्या ब्लॉकबस्टर 'बिगिल' नंतर प्रॉडक्शन हाऊसचा विजयसोबतचा हा दुसरा चित्रपट आहे. (Tollywood)

पुढच्या वर्षी ‘थलपति 68’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असून सध्या थलपती त्याच्या ‘लियो’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर विजय थलपती त्याच्या ६८ व्या चित्रपटासाठी २०० कोटी इतकं मानधन आकारणार असून सर्वात महागडा अभिनेता म्हणून त्याची सध्या चर्चा होत आहे. यापूर्वी अभिनेत्याला ८० कोटी रुपये इतके मानधन स्विकारले होते, परंतु नंतर लोकेश कनागराजच्या ‘लियो’ या पॅन-इंडियन चित्रपटामुळे ते वाढले.

Thalapathy Vijay New Movie Teaser
Amruta Khanvilkar Emotional Post: तुम्ही हा पुरस्कार खूप खास बनवला... अमृताच्या गैरहजेरीत आई-बाबांनी स्वीकारला सन्मान, अभिनेत्रीची भावुक पोस्ट

थलपथी विजय यापूर्वी त्याच्या ‘वारिसू’ चित्रपटामुळे चर्चेत होता. जानेवारीमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींहून अधिकची कमाई केली होती. आता हा चित्रपट ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ वर पाहायला मिळत असून ‘वारिसू’ व्यतिरिक्त विजय ऍटली दिग्दर्शित 'मेर्सेल', ॲक्शन फिल्म 'बीस्ट', 'बिगिल' या चित्रपटांनीही बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com