Tunisha Sharma: टुनिशाचा अतूट प्रेमानेच केला घात, 'त्या' टॅटुनं अधिक संशय बळावला...

दरम्यान, तुनिषा शर्माच्या एका जुन्या इंस्टाग्राम पोस्टने उघड केले आहे की तिचा प्रेमावर अतूट विश्वास होता.
Tunisha Sharma
Tunisha SharmaInstagram/ @_tunisha.sharma_

Tunisha Sharma: टेलिव्हिजन अभिनेत्री टुनिशा शर्माने शनिवारी मालिकेच्या सेटवर आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. काल मुंबईतील एका रुग्णालयात तिच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. या शवविच्छेदन अहवालात टुनिशाचे निधन श्वास गुदमरुन गेल्याचे स्पष्ट झाले आहे. टुनिशाच्या पार्थिवावर आज मुंबईतच अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सध्या कळत आहे.

Tunisha Sharma
Tunisha Sharma Death: टुनिशा शर्मा ठरली लव्ह जिहादचा बळी? पोलिसांनी स्पष्टच सांगितले; अभिनेत्रीच्या प्रेग्रेंसीबद्दलही मोठा खुलासा

(Television Actress) टुनिशाच्या (Tunisha Sharma) मृत्यू्प्रकरणी एफआयआर दाखल केल्यानुसार, टुनिशा आणि शीजान रिलेशनमध्ये होते. त्या दोघांचेही काही दिवसांपूर्वी ब्रेकअप झाल्याने थोडी तणावात होती. दरम्यान, तुनिषा शर्माच्या एका जुन्या इंस्टाग्राम पोस्टने उघड केले आहे की तिचा प्रेमावर अतूट विश्वास होता. तिने तिच्या हातावर 'Love Above Everything' अशा आशयाचा टॅटू काढला आहे. सध्या तिचा हा टॅटू काढलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Social Media)

Tunisha Sharma
Hrithik Roshan: हृतिक बनला खास व्यक्तीसाठी सांताक्लॉज, चाहत्यांकडून होतय कौतुक....

टॅटू काढतानाच्या या व्हिडिओवर चाहते बरेच कमेंट्स करीत आहे. या टॅटूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तुनिषा शर्माच्या प्रियकराला वसई न्यायालयाकडून ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. टुनिशा शर्मा ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत होती. या मालिकेचे शूटिंग वसई पुर्वेच्या कामण येथील भजनलाल स्टुडियोत सुरू होते. शनिवारी दुपारी साडेतीन वाजता टुनिशाने आपल्या मेकअप रूपमध्ये जाऊन गळफास घेतला.

Tunisha Sharma
Raju Shrivastav: 'द किंग ऑफ कॉमेडी' पदवी कमवणाऱ्या 'गजोधर भैय्या'चा जीवनप्रवास...

टुनिशाच्या आईने या प्रकरणात सहअभिनेता आणि टुनिशाचा मित्र शीजान मोहम्मद खान विरोधात तक्रार दाखल केली असून, त्याने टुनिशाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी शीजनला अटक केली आहे. टुनिशा प्रकरणातील एफआयआर कॉपीवरून हे उघड झाले आहे की शीजान मोहम्मद खानने 15 दिवसांपूर्वी तुनिषा शर्माचे ब्रेकअप झाले होते आणि त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com