Dilip Joshi Birthday : कधीकाळी ५० रुपये कमवायचे, आता कोट्यवधींची संपत्ती; 'तारक मेहता...'तल्या एका रोलने पालटलं दिलीप जोशींचं नशीब

Dilip Joshi Net Worth : आज दिलीप जोशी याचा वाढदिवस आहे. अभिनेत्याचा जन्म २६ मे १९६८ रोजी झाला असून तो आज आपल्या फॅमिलीसोबत ५६ वा वाढदिवस साजरा करीत आहे.
Dilip Joshi Net Worth : कधीकाळी ५० रुपये कमवायचे, आता कोट्यवधींची संपत्ती; 'तारक मेहता...'तल्या एका रोलने पालटलं दिलीप जोशींचं नशीब
Dilip Joshi BirthdaySaam Tv
Published On

गेल्या १५ वर्षांपासून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या ‘तारक मेहता का उल्टा’ या मालिकेची नेहमीच सोशल मीडियावर तुफान चर्चा होते. मालिकेतील सगळेच पात्र कायमच चर्चेत राहतात. मालिकेतील सर्वाधिक चर्चेत राहणारं पात्र म्हणजे जेठालाल गडाचं. जेठालाल गडाचं पात्र अभिनेता दिलीप जोशीने साकारले आहे. आज दिलीप जोशी याचा वाढदिवस आहे. अभिनेत्याचा जन्म २६ मे १९६८ रोजी झाला असून तो आज आपल्या फॅमिलीसोबत ५६ वा वाढदिवस साजरा करीत आहे.

Dilip Joshi Net Worth : कधीकाळी ५० रुपये कमवायचे, आता कोट्यवधींची संपत्ती; 'तारक मेहता...'तल्या एका रोलने पालटलं दिलीप जोशींचं नशीब
Sikander Bharti Dies : बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; वयाच्या ६० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दिलीप जोशी ९० च्या दशकातील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याचा जन्म गुजरातच्या पोरबंदरमध्ये झालेला आहे. दिलीप जोशीने आपल्या सिनेकारकिर्दीची सुरुवात छोट्या भूमिकांमधून केली आहे. करियरच्या सुरुवातीच्या दिवसांत अभिनेत्याने 'बॅकस्टेज आर्टिस्ट' म्हणून काम करायला सुरुवात केली. स्ट्रगलच्या दिवसांत दिलीप जोशी यांनी त्यांच्या कामासाठी फक्त ५० रुपये इतकं मानधन मिळालं होतं.

१९८९ मध्ये रिलीज झालेल्या 'मैने प्यार किया' या चित्रपटातून दिलीप जोशी यांनी बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. चित्रपटात दिलीपने सलमान खानच्या घरातील नोकराची भूमिका साकारली होती. पण या चित्रपटातून दिलीप जोशीला फारशी ओळख मिळाली नाही. 'मैने प्यार किया' नंतर अभिनेत्याने 'हमराझ', 'खिलाडी ४२०' आणि 'फिर भी दिल है हिंदुस्तानी' सारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

Dilip Joshi Net Worth : कधीकाळी ५० रुपये कमवायचे, आता कोट्यवधींची संपत्ती; 'तारक मेहता...'तल्या एका रोलने पालटलं दिलीप जोशींचं नशीब
Amruta Khanvilkar : मुंबई पोलिसांची पोस्ट अन् चर्चेत आली अमृता खानविलकर; काय आहे किस्सा

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेमुळे अभिनेता दिलीप जोशीला फार मोठी प्रसिद्धी मिळाली. या भूमिकेमुळे अभिनेत्याला महाराष्ट्रातील घराघरांत जेठालाल नावानेच प्रसिद्धी मिळाली. ही मालिका २००८ पासून सोनी सबवर टेलिकास्ट होत आहे. गेल्या १५ ते १६ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करीत आहे. अनेक वर्षांपासून ही मालिका टेलिकास्ट होत असल्यामुळे ही मालिका चाहत्यांची आवडती ठरली आहे. आज एका एपिसोडसाठी दिलीप जोशी दीड ते दोन लाख रुपयांचं मानधन घेतो. मीडिया रिपोर्टनुसार, दिलीप जोशीची एकूण संपत्ती ४५ ते ५० कोटी रुपयांच्या आसपास आहे.

Dilip Joshi Net Worth : कधीकाळी ५० रुपये कमवायचे, आता कोट्यवधींची संपत्ती; 'तारक मेहता...'तल्या एका रोलने पालटलं दिलीप जोशींचं नशीब
Juhi Parmar : वयाच्या १७ व्या वर्षीच प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री झाली कास्टिंग काऊचची शिकार, स्वत:च केला खुलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com