Tarak Mehta Ka Ooltah Chashmah Actress: आता पुन्हा लग्न? तारक मेहता फेम सोनू झाली नवरी, दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात

Taarak Mehta ka Ooltah Chashmah fame Jheel Mehta Video: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतील सोनू उर्फ झील मेहता सध्या चर्चेत आहे. झीलने पुन्हा एकदा लग्न केल्याचं समोर आलं आहे.
Entertainment News
Tarak Mehta Ka Ooltah Chashmah ActressSaam Tv
Published On

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतील सोनू उर्फ झील मेहता सध्या चर्चेत आहे. झीलने पुन्हा एकदा लग्न केल्याचं समोर आलं आहे. झीलने स्वत: याबाबतची माहिती सर्वांना दिली आहे. डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकलेल्या झीलने आता पुन्हा लग्न केल्यामुळे सोशल मीडियावर देखील लक्ष वेधते आहे.

Entertainment News
Marathi Movie: ‘सुधा - विजय १९४२’: प्रेम आणि स्वातंत्र्य संग्रामाची कहाणी लवकरच पडद्यावर, चित्रपट कधी होणार रिलीज

अभिनेत्री झील मेहता सर्वांच्या परिचयाची आहे. झीलने तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतून लोकप्रियता मिळवली आहे. सध्या अभिनेत्री या मालिकेत नसली तरी तीची क्रेझ चाहत्यांमध्ये आहे. सोशल मीडियावर झील मेहता तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.

नुकतंच झीलने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता पारंपारिक अंदाजामध्ये झील आणि तिचा नवरा दिसत आहे. दोघांनीही याआधी २८ डिसेंबर २०२४ मध्ये लग्नगाठ बांधली. मोठ्या थाटामाटात या दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला. सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नसोहळ्याचे फोटो व्हायरल झाले होते. झीलने बॉयफ्रेड आदित्य दुबेबरोबर लग्न केले आहे. मात्र आता पुन्हा या दोघांनी लग्न केल्याने ही जोडी सध्या चर्चेत आहे.

Entertainment News
Pushpa 3 Rampage Release Date : कधी रिलीज होणार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 3'? निर्मात्यांनी थेट तारीखच सांगितली, म्हणाले..

नुकत्याच शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये झील आणि आदित्य दोघांनीही रजिस्टर मॅरेज केल्याचं दिसत आहे. दोघांनीही एकमेकांच्या गळ्यात हार घातलेला आहे. आनंदात दोघेही खूपच सुंदर दिसत आहे.सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत झीलने 'Finally Legally Married 17-02-25' असा कॅप्शन दिलं आहे. सोशल मीडियावर झीलच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com