अभिनेत्रीला मोबाईलवर तासन् तास रील पाहणं पडलं महागात! मान झाली वाकडी,शस्त्रक्रियेसाठी मोजावे लागले ३ लाख

Mobile Reels Addiction: तासन् तास मोबाईलवर रील्स पाहण्याची सवय अभिनेत्रीच्या आरोग्यावर भारी पडल्याची घटना समोर आली आहे. मानेच्या समस्येमुळे तिला शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले.
REELS ADDICTION: ACTRESS UNDERGOES ₹3 LAKH NECK SURGERY AFTER EXCESSIVE PHONE USE
REELS ADDICTION: ACTRESS UNDERGOES ₹3 LAKH NECK SURGERY AFTER EXCESSIVE PHONE USEsaam tv
Published On
Summary
  • रील्स पाहण्याच्या अतिसवयीमुळे अभिनेत्रीच्या मानेवर शस्त्रक्रिया

  • मोबाईलच्या अतिवापरामुळे अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करावे लागले

  • शस्त्रक्रियेसाठी सुमारे ३ लाख रुपये खर्च

आजच्या काळात फोन हा सामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. झोपताना, उठताना, जेवताना, गेम खेळताना किंवा 'रील्स' पाहताना - बहुतेक लोक सतत आपल्या फोनमध्येच मग्न असतात मात्र, याच सवयीमुळे एका प्रसिद्ध अभिनेत्रीला नुकतेच रुग्णालयात दाखल व्हावे लागले. इतकेच नाही एका शस्त्रक्रियेलाही सामोरे जावे लागले. ही अभिनेत्री कोण आहे? हे जाणून घेऊ.

REELS ADDICTION: ACTRESS UNDERGOES ₹3 LAKH NECK SURGERY AFTER EXCESSIVE PHONE USE
7 Dogs Trailer: बॉलिवूड स्टार्सच्या स्वॅगने '7 डॉग्स'चा ट्रेलर गाजला; सलमान-संजयच्या जोडीने जिंकलं चाहत्यांचं मनं

पालकांपासून ते डॉक्टरांपर्यंत सर्वच जण फोनच्या अतिवापराला विरोध करतात. फोनच्या अतिवापरामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. एका अभिनेत्रीला अलीकडेच अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला. फोनच्या अतिवापरामुळे तिला मानेवर शस्त्रक्रियाही करावी लागली.

मोबाईलवर गेम्स खेळण्याची सवय

फोनच्या अतिवापरामुळे किंवा असं म्हणा फोनच्या व्यसनामुळे ज्या अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल व्हावे लागलं, ती अभिनेत्री दुसरी कोणी नसून दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनेत्री शकीला आहे. तिने नुकतेच तिच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर एक 'व्लॉग' (व्हिडिओ ब्लॉग) पोस्ट केलाय. यात तिने फोनच्या अतिवापराचा तिच्या आरोग्यावर कसा विपरीत परिणाम झाला.

REELS ADDICTION: ACTRESS UNDERGOES ₹3 LAKH NECK SURGERY AFTER EXCESSIVE PHONE USE
Kangana Ranaut: नसीरुद्दीन शाहांच्या वक्तव्यावर कंगना रणौतचा पलटवार; म्हणाली, बॉलिवूड पाकिस्तानची प्रेमकहाणी कधी संपणार?

मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे तिला रुग्णालयात जावे लागले, याबद्दल भाष्य केलंय. या व्लॉगमध्ये अभिनेत्रीने म्हटले आहे की, "फोन वापरणे चांगले आहे, परंतु त्याचा अतिवापर करणे धोकादायक आहे." शकीलाने १९९५ मध्ये 'प्लेगर्ल्स' या तमिळ चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटात सिल्क स्मिताचीही भूमिका साकारली होती. मात्र २००० मधील 'किन्नरा थुंबिकल' या मल्याळम चित्रपटामुळे तिच्या कारकिर्दीने तिला चांगली प्रसिद्धी मिळाली.

दरम्यान अभिनेत्री शकीलाने तिच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये सांगितले, "ती तिच्या अंथरुणाच्या कडेला पडून सलग चार तास फोनवर गेम्स खेळत राहायची. फक्त चहा किंवा कॉफी प्यायची इच्छा झाली तरच उठायची. चहा पिऊन झाल्यावर ती पुन्हा लगेच खेळायला सुरुवात करायची. तासन् तास रील्स, यूट्यूब आणि इन्स्टाग्राम पाहत घालवत असायची. चुकीच्या स्थितीत बसून जास्त वेळ घालवल्यामुळे माझ्या मानेचे स्नायू आणि मज्जातंतू ताणले गेले. त्यामुळे मला त्याची शस्त्रक्रिया करावी लागली.

REELS ADDICTION: ACTRESS UNDERGOES ₹3 LAKH NECK SURGERY AFTER EXCESSIVE PHONE USE
School Homework:विद्यार्थ्यांना मोबाईलवर अभ्यास देण्यावर बंदी; रत्नागिरीतील सर्व शासकीय आणि खासगी शाळांसाठी नियम लागू

शस्त्रक्रियेसाठी आला तीन लाख रुपयांचा खर्च

आपल्या युट्यूब व्हिडिओमध्ये शकीलाने सांगितले की, तिची शस्त्रक्रिया चेन्नईतील मेडवे हॉस्पिटलमध्ये झाली. डॉ. बालमुरुगन यांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली. मान पूर्णपणे बरे होईपर्यंत त्यांना मानेचा पट्टा (नेक कॉलर) वापरण्याचा सल्ला देण्यात आलाय. अशी परिस्थिती झाल्यानंतर अभिनेत्री आपल्या चाहत्यांना मोलाचा सल्ला दिलाय.

शकीला आपल्या व्हिडिओमध्ये म्हणाल्या की, "तुमचा फोन फक्त गरजेपुरताच वापरा. विनाकारण व्हिडिओ पाहणे थांबवा. अगदी माझे व्हिडिओही पाहू नका. अन्यथा, तुमचे केवळ ३ लाख रुपयांचे नुकसानच होईलच पण तुम्हाला वेदनाही सहन कराव्या लागतील."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com