7 Dogs Trailer: सलमान खान आणि संजय दत्त या लोकप्रिय जोडीला मोठ्या पडद्यावर एकत्र पाहून बराच काळ लोटला आहे. ‘साजन’, ‘चल मेरे भाई’ आणि ‘ये है जलवा’ यांसारख्या चित्रपटांमधून या दोघांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता ही जोडी ‘7 डॉग्स’ या आंतरराष्ट्रीय ॲक्शन-ड्रामा चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू झाली आहे.
ट्रेलरमध्ये सलमान खान आणि संजय दत्त यांचा दमदार अंदाज पाहायला मिळतो. दोन्ही कलाकारांचा स्वॅग आणि ॲक्शन पाहून चाहते भारावून गेले आहेत. मात्र, ट्रेलरमध्ये त्यांच्या भूमिकांबाबत फारशी माहिती देण्यात आलेली नाही. दोघांना मिळालेला स्क्रीन टाइम पाहता चित्रपटात त्यांच्या भूमिका महत्त्वाच्या असणार आहे.
‘7 डॉग्स’ हा आंतरराष्ट्रीय चित्रपट असून त्यात भारतासह इजिप्त, युरोप, हॉलिवूड आणि आशियातील कलाकारांचा सहभाग आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदिल अल अरबी आणि बिलाल फल्लाह यांनी केले आहे. हे दिग्दर्शक ‘बॅड बॉईज फॉर लाईफ’ आणि ‘बॅड बॉईज: राईड ऑर डाय’ यांसारख्या ॲक्शनपटांसाठी प्रसिद्ध आहेत.
चित्रपटाची कथा एका आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी सिंडिकेटभोवती फिरते. ‘पिंक लेडी’ नावाच्या धोकादायक अमली पदार्थामुळे या चित्रपटाच्या कथेला वेग मिळतो. इंटरपोल अधिकारी खालिद अल-अजाजी याने गुन्हेगारी टोळीतील वरिष्ठ सदस्य घाली अबू दाऊद याला अटक केल्यानंतर पुढे काय घडते हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट येत्या २१ ऑगस्टरोजी जगभरात प्रदर्शित होणार असून यामध्ये संजू-सलमानची जोडी पहायला मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.