

तमिळ अभिनेता कार्तिक सबेशचे ३७ व्या वर्षी निधन
कार्तिक सबेश यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा
कार्तिक सबेश हा संगीतकार देवा यांचा पुतण्या होता
तमिळ चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याने ३७ व्या वर्षी निधन झालं. अभिनेता कार्तिक सबेशचे सोमवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अवघ्या ३७ व्या वर्षी अभिनेत्याचं निधन झाल्यामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेत्याच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबीयांना आणि मित्र परिवाराला मोठा धक्का बसला आहे.
कार्तिक सबेश हे संगीतकार सबेश यांचे पुत्र आणि दिवंगत संगीतकार देवा यांचे भाचे होते. ३ दिवसांपूर्वीच संगीतकार देवा यांचे निधन झाले होते. या धक्क्यातून सावरत नाही त्यात अवघ्या ३ दिवसांत त्यांच्या कुटुंबीयांना दुसरा मोठा धक्का बसला. कार्तिक सबेशने अनेक तमिळ चित्रपटांमध्ये काम केले होते. कार्तिक सबेश हे काही काळापासून आजारी होते आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सोमवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कार्तिक यांच्या पश्चात त्यांची पत्नी रम्या कार्तिक आणि दोन मुली असा परिवार आहे.
कार्तिक सबेश यांच्या कुटुंबातील एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी रात्री उशिरा सव्वा अकरा वाजताच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीने चाहते आणि तमिळ सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली. तरुण वयात त्याचे निधन झाल्यामुळे सर्वांसाठीच हा मोठा धक्का आहे. सध्या त्याचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी घरी ठेवण्यात आले आहे. मंगळवारी दुपारी ४:३० वाजता चेन्नईतील वलसरवक्कम स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
दरम्यान, कार्तिक सबेश यांनी अनेक तमिळ चित्रपटांमध्ये काम केला. 'दम', 'वल्लवन', 'पट्टथु यानाई' आणि 'कुलिर १००' या चित्रपटामध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्याने आपल्या अभिनयाने तमिळ चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली. कार्तिकचे कुटुंब दक्षिण भारतीय संगीत आणि चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहे. तयांचे वडील सबेश हे संगीतकार आहेत. तर त्याचे काका देवा हे तमिळ चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध संगीतकार होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.