Priya Ahuja: रिटा रिपोर्टर बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे झाली ट्रोल, लूकवरुन बोलणाऱ्यांना सुनावले खडेबोल

अभिनेत्री प्रिया अहूजाने या मालिकेत रिटा रिपोर्टरची भूमिका साकारली आहे. प्रियानं तिच्या ग्लॅमरस लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
Priya Ahuja
Priya Ahuja Instagram/ @priyaahujarajda
Published On: 

Priya Ahuja: छोट्या पडद्यावरील कलाकारांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. आपल्या आवडत्या कलाकारांच्या आयुष्यात काय सुरु आहे, त्यांच्या रोजच्या आयुष्यात काय घडतंय याची सर्वच चाहत्यांना फार उत्सुकता असते. अशीच एक मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चश्मा'. या मालिकेने आपल्या लाडक्या प्रेक्षकांचे १४ वर्ष निखळ मनोरंजन केले आहे. त्यातील एकूण एक पात्र प्रेक्षकांच्या मनात खोलवर घर करुन बसले आहेत. त्यातील बऱ्याच पात्रांनी मालिकेतून काढता पाय घेतल्याने चाहते बरेच नाराज आहे.

Priya Ahuja
Akshara Singh: अक्षरा चश्म्यामुळे झाली ट्रोल, नेटकरी म्हणतात, 'तू तर दुसरी मिया खलीफाच…'

या मालिकेतील सर्वच कलाकार सोशल मीडियावर बरेच चर्चेत असतात. नेहमीच ते आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. या मालिकेतील एका अभिनेत्रीने तिचे खास फोटो शेअर केले आहेत. पण ती त्या फोटोंमुळे चांगलीच ट्रोल झाली आहे. अभिनेत्री प्रिया अहूजाने या मालिकेत रिटा रिपोर्टरची भूमिका साकारली आहे. प्रियानं तिच्या ग्लॅमरस लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

या फोटोला तिने कॅप्शन दिली की, 'तुम्ही स्वत:वर इतका विश्वास ठेवा की, कोणाच्याही मतांचा तुमच्यावर परिणाम होणार नाही.' या फोटोवरुन रिटा रिपोर्टर ट्रोल होत आहे.

Priya Ahuja Instagram Post
Priya Ahuja Instagram PostInstagram/ @priyaahujarajda

प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला एक पोस्ट शेअर करत ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिले आहे. त्या पोस्टमध्ये प्रिया म्हणते,'मी शेअर केलेल्या फोटोला ट्रोल करणार्‍यांना मला हे सांगायचे की, तुम्ही जे बोलता त्याचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही. तुमच्यापैकी अनेकांनी कमेंट करुन मालवला (प्रियाचा पती) हा प्रश्न विचारला की, तो मला असे कपडे घालण्याची परवानगी कशी देऊ शकतो?'

Priya Ahuja
Bigg Boss Marathi 4: दोन वाईल्ड कार्ड सह एका स्पर्धकाची बिग बॉसच्या घरातून एक्झिट, घरात नवे ट्विस्ट येणार

सोबतच प्रिया पुढे म्हणते, 'काही लोक माझ्या मुलाबाबत म्हणजेच अरदासबाबत देखील बोलत होते की, त्याची आई म्हणजे मी त्याला अशी शिकवण देत आहे. मी चांगली पत्नी किंवा आई आहे की नाही हे मालव आणि अरदासलाच ठरवू द्या. मला कोणतेही कपडे घालण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही.काय परिधान करावे, हे मी ठरवते.'

Priya Ahuja
Sayli Sanjiv: सायलीने ऋतुराजच्या नात्यावर केला खुलासा, 'यामुळे आमच्यात दुरावा…'

सध्या 'तारक मेहता का उल्टा चश्मा'या मालिकेला उतरती कळा लागली आहे, असे बोललो तरी वावगं ठरणार नाही, कारण गेल्या बऱ्याच दिवसांमध्ये बरेच जुने कलाकार मालिकेतून काढता पाय घेत आहेत. २०२० मध्ये प्रियाने मालिकेतून मेटर्निटी लिव घेतली होती. त्यानंतर ती क्वचितच मालिकेत दिसते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com