Akshara Singh: अक्षरा चश्म्यामुळे झाली ट्रोल, नेटकरी म्हणतात, 'तू तर दुसरी मिया खलीफाच…'

भोजपूरी अभिनेत्री अक्षरा सिंह नेहमीच सोशल मीडियावर या ना त्या कारणावरुन ट्रोल होत असते.
Mia Khalifa And Akshara Singh
Mia Khalifa And Akshara SinghSaam Tv

Akshara Singh: भोजपूरी अभिनेत्री अक्षरा सिंह नेहमीच सोशल मीडियावर या ना त्या कारणावरुन ट्रोल होत असते. अक्षरा सध्या ट्रोलिंगचा सामना करते एका कथित MMS चा. ती त्या व्हिडीओमुळे बरीच चर्चेत आहे. अक्षरा सिंगची सोशल मीडियावर फॅन फॉलोइंग लिस्ट ही बरीच मोठी आहे. नेहमीच अक्षरा सिंह सोशल मीडियावर तिचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर बरीच चर्चेत असते.

Mia Khalifa And Akshara Singh
Bigg Boss Marathi 4: दोन वाईल्ड कार्ड सह एका स्पर्धकाची बिग बॉसच्या घरातून एक्झिट, घरात नवे ट्विस्ट येणार

अलीकडेच अक्षरा सिंहने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती पूर्णपणे वेगळ्या लूकमध्ये दिसून येत आहे. या व्हिडिओत अक्षरा सिंगला पाहून चाहते तिची तुलना पॉर्न स्टार मिया खलिफाशी करण्यात आली आहे. या व्हिडिओमधील अक्षराचा लूक सर्वत्र चर्चेत आला आहे. तिने या व्हिडिओत गुलाबी रंगाचा टी-शर्ट आणि राखाडी रंगाची पँट घातलेली दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर नेटकरी बऱ्याच कमेंट्स करत आहेत.

अक्षराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडिओमध्ये अक्षरा सिंहने तिच्या चाहत्यांना प्रश्न विचारते की, तुम्ही मला ओळखलत का? तिच्या या प्रश्नावर क्रु मेंबर्सपैकी एकाने सांगितले की, भोजपुरी इंडस्ट्रीची सुपरस्टार अक्षरा सिंग. अक्षराने #piyakejulufiya च्या शूटमधील काही BTS सीन्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने ही व्हिडीओ शेअर केल्यामुळे तिला सध्या प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

Mia Khalifa And Akshara Singh
Sayli Sanjiv: सायलीने ऋतुराजच्या नात्यावर केला खुलासा, 'यामुळे आमच्यात दुरावा…'

या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे नेटकऱ्यांनी अक्षरा सिंगची तुलना मिया खलिफासोबत केली आहे. कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, दीदी चष्म्यात मिया खलिफा दिसते. तर आणखी एक नेटकरी म्हणतो, तू मिया खलिफाच दिसत आहेस. अक्षराने यापूर्वी 'ट्रान्सफर', 'सरकार राज' आणि 'सत्या' या चित्रपटात काम केले आहे. अक्षरा सिंह गेल्या वर्षी 'बिग बॉस' ओटीटीमध्येही दिसली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com