Gadar 2 Movie Box Collection: आता ‘गदर २’ रजनीकांतच्या ‘जेलर’वरही पडणार भारी!, कमाईचा आलेख चढताच

Gadar 2 Movie Box Office 12th day Collection: सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर ‘गदर २’ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरू आहे.
Gadar 2 12th Day Collection
Gadar 2 12th Day CollectionSaam TV

Gadar 2 Movie 12th Day Box Office Collection

सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर ‘गदर २’ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरू आहे. दुसऱ्या आठवड्यात चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी करताना दिसत आहे. चित्रपट ११ ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला असून चित्रपट नुकताच ५०० कोटींच्या क्लबमध्ये येण्याच्या रेसमध्ये पाहायला मिळत आहे. ‘गदर २’सोबतच ‘OMG 2’देखील बॉक्स ऑफिसवर दिलासादायक कमाई करताना दिसून येत आहे. चला तर जाणून घेऊया, चित्रपटाच्या १२ व्या दिवसाच्या कमाईबद्दल...

Gadar 2 12th Day Collection
Mitali Mayekar Post: 'एवढा मोठा निर्णय न डगमगता घेतला...', अभिनेत्री मिताली मयेकरची सासूबाईंसाठीची पोस्ट चर्चेत

सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर चित्रपट अक्षय कुमार-पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम स्टारर चित्रपटापेक्षा कमाईच्या बाबतीत खूप पुढे आहे. ‘गदर २’ हा २०२३ मधला दुसरा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे, तर आता ‘OMG 2’ देखील हिट चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. ‘गदर २’ने नुकतंच दुसऱ्या वीकेंडला जबरदस्त कलेक्शन करत शाहरुख खानचा 'पठान', सलमानचा 'टायगर जिंदा है' आणि 'केजीएफ'सह अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडित काढले आहेत. कायमच कमाईमध्ये अग्रेसर असणाऱ्या या चित्रपटाच्या कमाईमध्ये १२व्या दिवशी घसरण झाली आहे.

Gadar 2 12th Day Collection
Jawan Censor Board Certificate: शाहरुख खानच्या 'जवान'ला कात्री लागणार?; सेन्सॉर बोर्डाने सुचवले मोठे बदल

दरम्यान ‘गदर २’च्या एकंदरीत कमाईबद्दल बोलायचे तर, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ५० कोटी, तिसऱ्या दिवशी १०० कोटी, चौथ्या दिवशी १५० कोटी, पाचव्या दिवशी २०० कोटी, सहाव्या दिवशी २५० कोटी, आठव्या दिवशी ३०० कोटी, दहाव्या दिवशी ३५० कोटी तर बाराव्या दिवशी अर्थात २२ ऑगस्टला या चित्रपटाने ४०० कोटींची कमाई केली आहे. अवघ्या ७५ कोटींच्या बजेटमध्ये निर्मित केलेल्या या चित्रपटाचे थिएटरमध्ये शो हाऊसफुल्ल आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

तर एकूण ‘OMG 2’ सॅकल्निकच्या अहवालानुसार, ‘OMG 2’ ने पहिल्या आठवड्यात ८५.०५ कोटी कमावले होते. त्यानंतर विकेंडला या चित्रपटाने चांगली कमाई केली होती पण सोमवारी आणि मंगळवारी चित्रपटाच्या कमाईमध्ये हा चित्रपट काही प्रमाणात कुठे तरी मागे पडलेला दिसला. सॅकल्निकच्या अहवालानुसार, ‘OMG 2’ ने १२ व्या दिवशी ३.२० कोटी कमावले आहेत. चित्रपटाने आतापर्यंत एकूण १२०.६२ कोटींपर्यंतचा आकडा गाठला आहे. हा चित्रपट लवकरच १५० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.

Gadar 2 12th Day Collection
Shabana Azmi News: अभिनेत्री शबाना आझमींनाही ऑनलाईन फसवणुकीचा फटका, पोलिसात तक्रार

‘गदर २’ हा २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा सीक्वल आहे. ‘गदर २’ बॉक्स ऑफिसवर ‘जेलर’ला मागे टाकण्याची शक्यता सध्या, सोशल मीडियावर होत आहे. कारण चित्रपट प्रत्येक दिवशी १० कोटीपेक्षा जास्त कमाई करत आहे. या चित्रपटामधील गाणी प्रचंड हिट झाल्यामुळे प्रेक्षकांचा कल सर्वाधिक चित्रपटगृहाकडे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com