राज्य शासनाने 2022 पर्यंत नाट्यगृहांच्या भाड्यात सूट द्यावी - प्रशांत दामले

नाट्यक्षेत्राला पूर्वीप्रमाणे उभे करायचे असल्यास राज्य शासनाने विविध सोयी सुविधा वाढवून देण्यासह 2022 पर्यंत नाट्यगृहांच्या भाड्यात सूट द्यावी अशी अपेक्षा सुप्रसिद्ध नाट्यकर्मी आणि कलाकार प्रशांत दामले यांनी व्यक्त केली आहे.
राज्य शासनाने 2022 पर्यंत नाट्यगृहांच्या भाड्यात सूट द्यावी - प्रशांत दामले
राज्य शासनाने 2022 पर्यंत नाट्यगृहांच्या भाड्यात सूट द्यावी - प्रशांत दामले प्रदीप भणगे
Published On: 

डोंबिवली  : कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेपासून अर्थात होळीपासून बंद झालेली नाट्यगृहे शनिवारी, २३ ऑक्टोबरपासून पुन्हा उघडली आहेत. शासनाने जारी केलेल्या निर्देशानुसार ही नाट्यगृह उघडण्यात आली. तर राज्यात डोंबिवलीत नाटयप्रयोगाचा मान मिळाला आहे. डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात प्रशांत दामले यांचे एका लग्नाची दुसरी गोष्ट या नाटकाचा प्रयोग असून नाटक हाऊसफुल झाले आहे. तर नाट्यरसिका मध्ये नाटक सुरू झाली म्हणून आंनदाचे वातावरण आहे. नाटक पाहण्यासाठी नाट्यरसिक कल्याण, डोंबिवली, भांडुप, अंबरनाथ आणि बदलापूर येथे आले होते. तर गाऱ्हाणे घातलं नाट्यप्रयोगला सुरवात केली.

हे देखील पहा :

नाट्यक्षेत्राला पूर्वीप्रमाणे उभे करायचे असल्यास राज्य शासनाने विविध सोयी सुविधा वाढवून देण्यासह 2022 पर्यंत नाट्यगृहांच्या भाड्यात सूट द्यावी अशी अपेक्षा सुप्रसिद्ध नाट्यकर्मी आणि कलाकार प्रशांत दामले यांनी व्यक्त केली आहे. कोरोनामुळे बंद झालेली राज्यातील नाट्यगृह आज तब्बल 6 महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा सुरू होत आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दामले यांनी ही अपेक्षा व्यक्त केली. कोरोनामुळे नाट्यक्षेत्राचे जे नुकसान झाले त्याबद्दल आता बोलण्यात काही अर्थ नाही. मात्र नाट्यकर्मींनी शासनाकडे आर्थिक मदतीची कधीच मागणी केली नाही.

राज्य शासनाने 2022 पर्यंत नाट्यगृहांच्या भाड्यात सूट द्यावी - प्रशांत दामले
Nagpur : बापरे! चारित्र्याच्या संशयावरून झोपलेल्या पत्नीच्या चेहऱ्यावर टाकले उकळते तेल!
राज्य शासनाने 2022 पर्यंत नाट्यगृहांच्या भाड्यात सूट द्यावी - प्रशांत दामले
Mumbai: तृतीयपंथी बनून लोकांना लुटणाऱ्या अट्टल भामट्याला अटक!

त्याऐवजी राज्य शासनाने आम्हाला टप्प्याटप्प्याने सोयी - सुविधा वाढवून द्याव्या, तसेच 2022 पर्यंत राज्य शासनाने नाट्यगृहांच्या भाड्यात सूट देण्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. नाट्यक्षेत्रासाठी शासनाने या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यास डिसेंबर 2023 पर्यंत नाट्यक्षेत्र पूर्वी जसे होते तसे उभे राहिल असा विश्वासही प्रशांत दामले यांनी यावेळी व्यक्त केला. तर नाट्यक्षेत्र बंद असल्याने अनेक नवनवीन नाट्य कलाकार, दिग्दर्शक, लेखक हे सध्या मोठ्या प्रमाणात सिरियलकडे वळाले असल्याची चिंता दामले यांनी यावेळी व्यक्त केली. नाट्यक्षेत्राला सध्या एका मोठ्या संक्रमणाला सामोरे जावे लागत असून राज्य सरकारने सुविधा द्याव्यात. या सुविधा कागदावर असल्याने नाट्यक्षेत्र पूर्वीप्रमाणे उभे राहण्यास त्यांचा नक्कीच फायदा होईल असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.