स्टार प्रवाह वाहिनीवर मालिकांचा महासंगम पाहायला मिळणार आहे.
'ठरलं तर मग', 'थोडं तुझं आणि थोडं माझं' आणि 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' या मालिकांचा महासंगम विशेष भागात समावेश आहे.
'ठरलं तर मग' मालिकेत लवकरच सायलीच तन्वी असल्याचे सत्य मधुभाऊंना समजणार आहे.
येणाऱ्या दिवसांत मालिकांची बंपर मेजवानी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या स्टार प्रवाहाच्या काही मालिकांमध्ये रंजक वळण पाहायला मिळत आहे. अनेक खुलासे मालिकांमध्ये होणार आहेत. या खुलाशांचा मोठा महासंगम पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या आठवड्यात स्टार प्रवाहच्या सुपरहिट तीन मालिकांचा महासंगम पाहायला मिळेल.
मालिकांचा महासंगम हा विशेष भाग तब्बल दीड तासांचे असणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होणार आहे. महासंगममध्ये 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) , 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' (Laxmichya Paulanni ) आणि 'थोडं तुझं आणि थोडं माझं' (Thod Tuz Ani Thod Maz ) या तीन मालिकांचा समावेश आहे. याचा खास प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोला हटके कॅप्शन देण्यात आले आहे. प्रोमोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "न पाहिलेलं, न घडलेलं...तीन महामालिका, तीन महाखुलासे... 'तीन महामालिकांचा महासंगम'..."
प्रोमोवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. प्रेक्षक मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मालिकांचा महासंगम 11 ते 15 ऑगस्ट दररोज रात्री 8:30 ते 10 वाजेपर्यंत स्टार प्रवाह वाहिनीवर पाहता येणार आहे. 'ठरलं तर मग' मालिकेत नुकताच विलास खून प्रकरणाचा निकाल लागला असून प्रियाला जन्मठेप तर साक्षीला तब्बल सात वर्षांच्या शिक्षा मिळाली आहे. तर वात्सल्य आश्रम पुन्हा उघडला आहे. सायलीच तन्वी असल्याचे सत्य आता लवकरच मधुभाऊंना समजणार आहे. प्रतिमाचा भूतकाळ तिला आठवणार आहे.
'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत कला राहुलचा पर्दाफाश करणार आहे. त्याच्या खोटेपणाचे तिला पुरावा मिळणार आहे. तर दुसरीकडे 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मध्ये गायत्रीचा भूतकाळ सर्वांसमोर येणार आहे. त्यामुळे येणारा महासंगम खूपच रोमांचक असणार आहे. या तिन्ही मालिका आता कोणते वळण घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मालिकांचा महासंगम कोणत्या वाहिनीवर पाहता येणार आहे?
स्टार प्रवाह वाहिनी
महासंगमध्ये कोणत्या मालिकांचा समावेश आहे?
'ठरलं तर मग', 'थोडं तुझं आणि थोडं माझं' आणि 'लक्ष्मीच्या पाऊलांनी'
महासंग कोणत्या दिवसापासून सुरू होणार आहे?
11 ते 15 ऑगस्ट
महासंग कोणत्या वेळेत पाहता येणार?
रात्री 8:30 ते 10 वाजेपर्यंत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.