Gharoghari Matichya Chuli Video : भूतकाळाचे सावट वर्तमानावर; 12 वर्षांपूर्वी काय घडलं जानकी-हृषीकेशच्या आयुष्यात, पाहा लग्नाआधीची गोष्ट

Gharoghari Matichya Chuli Update : 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. आता जानकी-हृषीकेशची लेक आपल्या आई-वडिलांची लग्नाआधीची लव्हस्टोरी सांगणार आहे.
Gharoghari Matichya Chuli Update
Gharoghari Matichya Chuli VideoSAAM TV
Published On
Summary

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत धक्कादायक वळण आले आहे.

मालिकेत १२ वर्षांपूर्वीचा फ्लॅशबॅक दाखवण्यात येणार आहे.

जानकी-हृषीकेशची लव्ह स्टोरी त्यांची लेक सांगत आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'घरोघरी मातीच्या चुली' (Gharoghari Matichya Chuli ) ही मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. सध्या मास्क मॅन जानकी-हृषीकेशच्या आयुष्यात वादळ घेऊन आला आहे. तर दुसरीकडे ऐश्वर्या नावाच्या संकटाची टांगती तलवार कायम जानकी-हृषीकेशच्या कुटुंबावर पाहायला मिळते. मास्क मॅनची कहाणी उलगडण्यासाठी 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत 12 वर्षांचा फ्लॅशबॅक दाखवण्यात येणार आहे. याचा खास प्रोमो समोर आला आहे.

'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत जानकी-हृषीकेशच्या लग्नाआधीची गोष्ट आता पाहायला मिळणार आहे. त्याची लव्ह स्टोरी पाहायला प्रेक्षक आतुर आहेत. मालिकेतील या मोठ्या बदलाचा नक्कीच टिआरपीवर फरक पडलेला दिसेल. 12 वर्षांपूर्वी जानकी-हृषीकेशची भेट कशी झाली. त्यांचे प्रेम कसं जुळले? त्यानंतर त्याचे लग्न कसे झाले? या लव्ह स्टोरीचा व्हिलन कोण होता? हे सर्व या कथेत उलघडणार आहे.

12 वर्षांपूर्वी जानकी-हृषीकेशच्या आयुष्यात मकरंद नावाचे मोठे वादळ आले होते. ज्याचे वाईट परिणाम आता जानकी-हृषीकेशच्या आयुष्यावर होत आहेत. या लव्ह स्टोरीत एक हिरो, एक हिरोइन आणि एक व्हिलन आहे. नवीन प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, हृषीकेश आपल्या डॅशिंग स्टाइलने एका आजीला चोराने चोरलेली त्यांची सोन्याची चैन आणून देतो. तर दुसरीकडे जानकी पाणीपुरी खाताना दिसत आहे. तिची निरागसता पाहूनच हृषीकेश तिच्या प्रेमात पडतो. पहिल्याच भेटीत हृषीकेश आणि जानकीमध्ये छोटे भांडण होताना दिसते. तेव्हाच मास्क घातलेला व्हिलनही तेथे येतो आणि भयंकर कथेला सुरूवात होते.

आता मास्क मॅनच्या रुपात कोणत्या नवीन हिरोची मालिकेत एन्ट्री पाहायला मिळणार आहे. याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेच नवा अध्याय 4 नोव्हेंबरपासून दररोज संध्याकाळी 7:30 वाजता स्टारप्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. नवीन प्रोमोवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. लवकरच  'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत मास्क मॅनचा चेहरा दिसणार आहे.

Gharoghari Matichya Chuli Update
अमाल मलिक अन् मालती चहरचे नेमकं नातं काय? 'Bigg Boss 19' च्या घरात मोठा खुलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com