New Marathi Serial: मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच; तीन महिन्यांत सुरु होणार आठ नव्या मालिका

New Marathi Serial: स्टार प्रवाहने मराठी टेलिव्हिजनमध्ये इतिहास रचत एकाचवेळी ८ नव्या मालिका आणि कार्यक्रमांची घोषणा केली. पुढील तीन महिन्यांत मनोरंजनाची नवी पर्वणी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
New Marathi Serial
New Marathi SerialSaam Tv
Published On

New Marathi Serial: मराठी मनोरंजन विश्वात स्टार प्रवाह वाहिनीने एक नवा इतिहास रचला आहे. मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात प्रथमच एका वाहिनीने एकाच वेळी तब्बल आठ नव्या कार्यक्रमांची घोषणा करत ‘प्रवाह गर्जना’ हा भव्य सोहळा पार पाडला. पुढील तीन महिन्यांत हे सर्व कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, मनोरंजनाचा नवा अध्याय सुरू होणार आहे.

गेल्या साडेपाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या स्टार प्रवाहने आपल्या मालिकांमधून घराघरातील नातेसंबंध, भावना आणि सामाजिक विषय प्रभावीपणे मांडले आहेत. आता याच परंपरेला पुढे नेत वाहिनीने ‘पाठराखीण’, ‘सुना येती घरा’, ‘विसरू नको मला’, ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’, ‘मराठी मिडीयम’, ‘मी कात टाकली’, ‘आता होऊ दे धिंगाणा ५’ आणि ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२६’ या आठ कार्यक्रमांची घोषणा केली आहे.

New Marathi Serial
Superstar Scammed: प्रसिद्ध अभिनेत्याची ७ कोटींची फसवणूक, २ वर्षे बँकेतून उडवले पैसे; धक्कादायक घोटाळा उघड

‘पाठराखीण’ ही दोन बहिणींच्या नात्यातील प्रेम, त्याग आणि संघर्षाची भावनिक कथा आहे. प्राजक्ता गायकवाड, गौरी इंगवले, शुभंकर तावडे आणि आशय कुलकर्णी यांसारखे कलाकार या मालिकेत झळकणार आहेत. सोहम प्रोडक्शन्स निर्मित आणि विघ्नेश कांबळे दिग्दर्शित ही मालिका प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारी ठरणार आहे. ‘सुना येती घरा’ ही दोन कुटुंबांमधील भावनिक नात्यांची आणि बदलत्या कौटुंबिक समीकरणांची कथा उलगडणार आहे. अशोक शिंदे, मेघना वैद्य, दीपा परब, शर्मिष्ठा राऊत आणि सत्यजीत साळोखे यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांना नव्या नात्यांचा अनुभव देणार आहे.

New Marathi Serial
Famous Poet Death: उर्दू शायरीच्या सुवर्ण युगाचा अंत, प्रसिद्ध शायर काळाच्या पडद्याआड, साहित्यविश्वात शोककळा

‘विसरू नको मला’ ही उत्कट प्रेमकथा असून तन्वी मुंडले आणि शाल्व किंजवडेकर यांची प्रमुख भूमिका यात पाहायला मिळणार आहे. तर चिन्मय मांडलेकर आणि मंदार देवस्थळी यांची जोडी ‘मराठी मिडीयम’मधून मराठी भाषा आणि संस्कृतीची अस्मिता जपणारी कथा घेऊन येत आहे. ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’मध्ये अभिनेत्री ऐश्वर्या नारकर एका सामान्य शिक्षिकेची भूमिका साकारणार आहेत. तर रहस्य, गूढ आणि थरार यांचा संगम असलेली ‘मी कात टाकली’ ही मालिका देखील विशेष आकर्षण ठरणार आहे.

याशिवाय प्रेक्षकांचा लाडका सिद्धार्थ जाधव विनोदी कार्यक्रम ‘आता होऊ दे धिंगाणा’ पाचव्या पर्वासह परतणार आहे. तसेच ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२६’ या भव्य सोहळ्याद्वारे बाप्पाच्या आगमनाचा जल्लोषही यंदा दिमाखात साजरा केला जाणार आहे. त्यामुळे येणारे काही महिने स्टार प्रवाहच्या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहेत.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com