Spanish Actress Ana Obregon : काय सांगता! मुलाची शेवटची इच्छा केली पूर्ण; आईनेच दिला मुलाच्या बाळाला जन्म

त्यामुळे सरोगसीच्या माध्यमातून अभिनेत्रीने आपल्या मुलाच्या बाळाला जन्म दिला आहे.
Ana Obregon
Ana ObregonSaam TV
Published On

Ana Obregon : आईची ममता अपार असते. एक आई आपल्या मुलांसाठी सर्व गोष्टींचा त्याग करते. अशात स्पेनमधून एक चकित करणारी बातमी समोर आली आहे. एका आईने आपल्याच मुलाच्या मुलीला जन्म दिला आहे. सदर महिला ही स्पेनमधील प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री असून तीचं नाव एना अब्रेगोन असं आहे. या एनाने स्वतः याबाबत माहिती दिली आहे. (Marathi News)

मुलासाठी दिला त्याच्याच मुलीला जन्म

या अभिनेत्रीच्या मुलाची अशी इच्छा होती की त्याला एक बाळ पाहिजे. त्यामुळे सरोगसीच्या माध्यमातून अभिनेत्रीने आपल्या मुलाच्या बाळाला जन्म दिला आहे. यामध्ये तिला एक गोंडस कन्यारत्न प्राप्त झाले आहे.

Ana Obregon
Kajol Devgan : ब्लॅक डीप नेक वनपीसमध्ये काजोलचा किलर लूक

मुलाची शेवटची इच्छा आईने केली पूर्ण

अभिनेत्रीने आपल्या मुलाविषयी सांगता पुढे सांगितले की, साल 2020 मध्ये तिच्या मुलाचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. निधन झाले तेव्हा मुलगा केवळ 27 वर्षांचा होता. या जगात आपलं एक मूल असावं अशी त्याची इच्छा होती. आपल्या मुलाची ही शेवटची ईच्छा पूर्ण कशी करावी हा मोठा प्रश्न अभिनेत्री समोर उभा होता. त्यामुळे तिने सरोगसीचा पर्याय निवडला आहे.

अभिनेत्री (Actress) एना सध्या 68 वर्षांच्या आहेत. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर बाळासोबतचे अनेक फोटो पोस्ट केलेत. बाळाचे हे फोटो आणि आईची ही कामगिरी पाहून अनेक चाहत्यांनी त्यांना दाद दिली आहे. एक आई आपल्या मुलाच्या सुखासाठी किती कष्ट घेऊ शकते हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं, असं एका चाहत्याने म्हटलं आहे. आपल्या एका मुलाखतीमध्ये नवजात मुलीविषयी सांगताना त्या म्हणाल्या की, ही माझी मुलगी आणि नात दोन्ही आहे.

Ana Obregon
Gautami Patil First Movie: गौतमी पाटीलच्या पहिल्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; घुंगरू चित्रपटातून अभिनयात पदार्पण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com