दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने लोकांच्या मनावर ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत (Rajinikanth) यांची तब्येत खालावली आहे. रजनीकांत यांना सोमवारी रात्री उशिरा चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रजनीकांत यांचे वय 73 वर्ष आहे. रजनीकांत यांना पोटात तीव्र वेदना होत असल्यामुळे त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. मीडिया रिपोर्टनुसार आज त्यांच्या काही विशेष टेस्ट होणार असल्याचे सांगितले जात आहे.
रजनीकांत यांना पोटात तीव्र वेदना सुरू झाली असल्यामुळे चेन्नईतील अपोलो ग्रीम्स रोड रुग्णालयात त्यांना ऍडमिट करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या पत्नीकडून मिळाली आहे. त्या मीडियाशी बोलताना म्हणाल्या की, रजनीकांत यांची प्रकृती गेल्या काही वर्षांत अनेक वेळा बिघडली आहे. 2016 मध्ये अमेरिकेत किडनी प्रत्यारोपणही झाले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
रजनीकांत रुग्णालयात दाखल असल्याची बातमी ऐकताच चाहत्यांची चिंता वाढली आहे. तसेच कलाकारही त्यांच्या तब्येतीची चौकशी करताना पाहायला मिळत आहेत. चाहते ते लवकर बरे व्हावे याची प्रार्थना करत आहेत.
रजनीकांत यांची गणना भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांमध्ये केली जाते. रजनीकांत यांनी 49 वर्षांहून अधिक काळ फिल्म इंडस्ट्रीत घालवला आहे. तर त्यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
भारत सरकारने रजनीकांत यांना 2000 मध्ये पद्मभूषण आणि 2016 मध्ये पद्मविभूषण देऊन गौरवण्यात आले. तसेच 2014 मध्ये भारताच्या 45 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांना भारतीय चित्रपट व्यक्तिमत्वासाठी शताब्दी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रजनीकांत यांची मोठी फॅन फॉलोइंग आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.