Rajinikanth News : माध्यमांनी प्रश्न विचारताच अभिनेते रजनीकांत संतापले; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Rajinikanth Got Angry On Media : सुपरस्टार रजनीकांत यांचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात ते मीडियावर संतापलेले पाहायला मिळत आहे. या मागचे नेमकं कारण जाणून घ्या
Rajinikanth Got Angry On Media
Rajinikanth NewsSAAM TV
Published On

दाक्षिणात्य (South) चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यांचा स्वभाव शांत आणि समजूतदार आहे. मात्र अलीकडेच त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सुपरस्टार रजनीकांत खूप रागवलेले आणि चिडलेले पाहायला मिळत आहेत. रजनीकांत नेहमीच आपल्या शांत स्वभावासाठी ओळखले जातात. नेमका या व्हिडिओमध्ये त्यांना कोणत्या गोष्टीवरून राग आला आहे हे जाणून घेऊयात.

अभिनेता रजनीकांत हे 20 सप्टेंबर रोजी 'वेट्टियान' ऑडिओ लाँचपूर्वी चेन्नई (chennai) विमानतळावर दिसले. लोकेश कनगराजच्या 'कुली' चित्रपटातील काही दृश्यांचे शूटिंगही चेन्नई शहरात होणार असल्याचे बोले जात आहे. तेव्हा मीडियाने त्यांना स्पॉट करून अभिनेते आणि द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्याबद्दल विचारले. त्यावर ते मीडियावर संतापले (Rajinikanth Got Angry On Media ) आणि म्हणाले की," राजकीय प्रश्न विचारू नका."

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पापाराझी यांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्या विषयी रजनीकांत यांना विचारले. उदयनिधी स्टॅलिन यांच्या तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री बनण्याच्या अफवांवर प्रश्न विचारला. त्यामुळे अभिनेते रजनीकांत संतापले आणि उत्तर देताना म्हणाले की, "मी तुला आधीच सांगितले आहे की, मला राजकीय प्रश्न विचारू नका."

पापाराझी यांनी सुपरस्टार रजनीकांत यांना 'वेट्टय्यान' या चित्रपटाविषयी देखील विचारले. त्यावर अभिनेता रजनीकांत यांनी, 'वेट्टय्यान' लवकरच येत आहे आणि आम्ही त्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले.

Rajinikanth Got Angry On Media
Bigg Boss Marahi 5: अरबाज घरातून गेल्यानंतर दुसरा साथीदार पाहिजे का? पत्रकारांचा प्रश्न ऐकून निक्कीचं पडलं तोंड

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com