Bigg Boss Marahi 5
Bigg Boss Marahi 5Saam Tv

Bigg Boss Marahi 5: अरबाज घरातून गेल्यानंतर दुसरा साथीदार पाहिजे का? पत्रकारांचा प्रश्न ऐकून निक्कीचं पडलं तोंड

Bigg Boss Marathi Nikki Tamboli: अरबाज गेल्यानंतर निक्की तू दुसरा शोधणार का...? पत्रकारांनी थेट प्रश्न विचारल्यानंतर निक्की काय म्हणाली
Published on

बिग बॉस मराठीचा ८ आठवडा सध्या चर्चेत आहेत. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात स्पर्धकांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशातच आता बिग बॉसचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये बिग बॉसच्या घरात स्पर्धकांची प्रश्न- उत्तरांची शाळा सुरू असल्याची पाहायला मिळतेय.

Bigg Boss Marahi 5
Navra Mazha Navsacha 2 Collection: सुप्रिया-सचिन अन् अशोम मामांची जोडी बॉक्स ऑफिसवर गाजली; 'नवरा माझा नवसाचा २' चित्रपटाने पहिल्याच दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

बिग बॉस मराठीच्या या कार्यक्रमांमध्ये दर शनिवारी आणि रविवारी भाऊच्या धक्क्यावर स्पर्धकांची शाळा घेतली जाते. मात्र या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धकांना भाऊचा धक्का नाही तर मोठा धक्का मिळाल्याचं दिसत आहे. कारण या आठवड्यात भाऊचा धक्का नाही तर महाराष्ट्राचा धक्का हा कार्यक्रम होणार आहे ज्यामध्ये बिग बॉस स्पर्धकांना पत्रकारांच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागणार आहेत.

नुकताच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये, पत्रकार बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना प्रश्न विचारत आहे. दरम्यान यावेळी पत्रकारांनी निक्कीला थेट अरबाजच्या जाण्यावर प्रश्न विचारून चिंतेत टाकलं आहे. "तुला असं वाटतंय का की अरबाज आता घरातून जाईल आणि आता त्यानंतर आपल्याला दुसरा साथीदार पाहिजे" जान्हवी हा प्रश्न ऐकताच निराश झाल्याची दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com