Prabhas Charge 150 Crore For Project K
Prabhas Charge 150 Crore For Project K Saam TV

Prabhas Movie Fees : प्रभासचे मानधन खरंच १५० कोटी? मानधनाच्या चर्चांना पुर्णविराम

Prabhas Fake News : प्रभासचे मानधन ऐकून अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. पण ही माहिती खोटी असल्याचे आता उघड झाले आहे.
Published on

Prabhas Charge 150 Crore For Project K : प्रभासच्या 'आदिपुरूष' चित्रपटाची चर्चा अजूनही होत आहे. तर आदिपुरुषनंतर आता प्रभासच्या 'प्रोजेक्ट के'कडे प्रेक्षकांचे लक्ष लगले आहे. प्रभासचा प्रजेक्ट के या चित्रपटाच्या चर्चा सगळीकडे होत आहे. या बिग बजेट चित्रपटामुळे कलाकार चांगलाच चर्चेचा विषय बनले आहे. नुकतीच कलाकारांच्या मानधनाबद्दल माहिती समोर आली होती. प्रभासचे मानधन ऐकून अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. पण ही माहिती खोटी असल्याचे आता उघड झाले आहे.

प्रभासचा आदिपुरूषनंतर 'प्रोजेक्ट के' हा बिग बजेट सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटासाठी प्रभासने १५० कोटींचे मानधन घेतल्याची माहिती समोर येत होती. पण आता ही माहिती खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रभासच्या मानधनाविषयी अफवा पसरवल्या जात आहेत.

Prabhas Charge 150 Crore For Project K
Bollywood Upcoming Movies : बॉलिवूड निर्मात्यांची 'नो रिस्क पॉलिसी'; फ्लॉपच्या भीतीमुळे बदलल्या चित्रपटाच्या तारखा

एका रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अशा अफवा पसरवल्या जात आहेत, अशी माहीती समोर आली आहे. कलाकारांना अजून मोठे किंवा प्रसिद्ध दाखवण्यासाठी मानधनाच्या संख्येत फेरबदल केल्याचे सांगण्यात येत आहे. प्रभासच्या १५० कोटींच्या मानधनाच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. पण १५० कोटी रुपयांचे मानधन घेतल्याची माहिती अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रभासच्या बॉक्स ऑफिसवरील प्रमोशनसाठी मानधनातील आकड्यांची फेरबदल केली आहे. प्रभासच्या मानधनाची बातमी जाणूनबुजून पसरवण्यात आल्याचेही लक्षात आले आहे. तर यामुळे मात्र चित्रपटातील माहितीवर विश्वास ठेवायचा की नाही याबाबत प्रेक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नुकताच प्रभासचा 'आदिपुरुष' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४५० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. पण चित्रपटाच्या कथानकामुळे चित्रपटातील कलाकारांना, निर्माता, दिग्दर्शक आणि लेखकाला प्रचंड ट्रोल करण्यात आले.

Prabhas Charge 150 Crore For Project K
HBD Geeta Kapoor : हवाईसुंदरी बनण्याचे स्वप्न पाहणारी गीता माँ कशी झाली प्रसिद्ध कोरिओग्राफर ; जाणून घ्या तिचा प्रवास

'केजीएफ'चे दिग्दर्शक प्रशांत नीलसोबत प्रभासचा 'सलार' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. ६ जुलैला चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. प्रभासच्या 'सलार'नंतर 'प्रोजेक्ट के'चीही खूप चर्चा होत आहे. 'प्रोजेक्ट के' हा बिग बजेट चित्रपट असून चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन, दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन, दीपिका पदुकोन अशी स्टाकास्ट दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com