बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. समाज कार्यासाठी सोनू सूद कायम पुढे असतो. सध्या सोनू सूदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सोनू सूदने सोसायटीच्या आवारात आढळलेला साप स्वतः पकडला आणि गोणीत भरला आहे.
सोनू सूदने सोशल मीडियावर साप पकडतानाचा व्हिडीओ शेअर करून त्याला एक खास कॅप्शन दिलं आहे. व्हिडीओमध्ये सोनू सूद म्हणतो की, "आमच्या सोसायटीत रॅट साप आला आहे. हा साप बिनविषारी आहे. जर साप सोसायटीत आला तर प्रोफेशनल लोकांना बोलवा आणि त्याला बाहेर काढा. मला साप पकडायला येतो म्हणून मी हे करत आहे. मात्र साप पकडताना काळजी घ्या. आपण याला जंगलात सोडून येऊया..."
सोनू सूदने सापाला कोणतीही दुखापत न करता त्याला गोणीत भरलेले व्हिडीओत पाहायला मिळत आहे. सोनूने सापाला पकडून त्याचा जीव वाचवला आहे. सोसायटीमध्ये साप शिरल्याने नागरिक घाबरले होते. मात्र सोनू सूदने सापाला बाहेर काढून साप आणि नागरिकांचे प्राण वाचवले.
सोनू सूदने हा व्हिडीओ शेअर करून कॅप्शमध्ये "हर हर महादेव!" असे लिहिलं आहे. त्याच्या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. चाहते त्याच्या या कृतीचे कौतुक करताना दिसत आहेत.
अलिकडेच लातूरच्या एका शेतकरी जोडप्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. वृद्ध जोडप्याकडे बैल नसल्यामुळे वृद्ध आजोबा स्वतःला औताला जुंपून शेती करत आहेत. हा व्हिडीओ पाहताच सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला. तो ट्विट करत म्हणाला की, "आप नंबर भेजिए। हम बैल भेजतें हैं।" सोनू सूदच्या या कृतीने साऱ्यांचे मन भारावून गेले आहे. सोनू सूद कायम गरजूंना मदत करताना पुढे असतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.