Gautami Patil : ठसकेबाज डान्स अन् कातिल अदा; गौतमीच्या नव्या गाण्याची होतेय चर्चा, पाहा VIDEO

Gautami Patil New Song : नृत्यांगना गौतमी पाटील लवकरच नवीन गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गाण्याच्या शूटिंगचा व्हिडीओ पाहा.
Gautami Patil New Song
Gautami PatilSAAM TV
Published On

नृत्यांगना गौतमी पाटील(Gautami Patil) कायम आपल्या हटके डान्समुळे चर्चेत असते. तिने आपल्या सौंदर्याने आणि नृत्याने चाहत्यांना वेड लावले आहे. तिच्या कातिल अदा पाहून चाहते नेहमीच घायाळ होतात. तिच्या गाण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे गौतमीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. गौतमी नवीन एका गाण्यामधून प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे.

नुकताच गौतमी पाटीलने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यातती नवीन गाण्याची शूटिंग करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये गौतमीने देवाची पूजा करून नवीन कामाला सुरुवात केलेली पाहायला मिळत आहे. पुढे व्हिडीओत ती डान्स आऊटफिटमध्ये दिसत आहे. तसेच स्टेजवर नवीन गाण्याची डान्स प्रॅक्टिस करताना दिसत आहे. गौतमीने सुंदर लाल रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे.

गौतमी पाटीलचा नवीन प्रोजेक्ट एंजल्स डान्स अकादमी पुणे यांच्यासोबत आहे. चाहते गौतमी पाटीलच्या नवीन गाण्यासाठी खूप उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहेत. गौतमी पाटीलच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होताना दिसत आहे. मात्र अद्याप गाण्याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही आहे. गौतमीने आपल्या नृत्याच्या जोरावर महाराष्ट्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

वर्कफ्रंट

अलिकेड गौतमी पाटील अनेक मालिकांमध्ये झळकली आहे. तसेच तिने मालिकांमध्ये देखील काम केले आहे. तिच्या गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. गौतमी पाटील अलिकडेच 'शिट्टी वाजली रे' या कुकिंग शोमध्ये पाहायला मिळाली. तसेच तिच्या 'देवमाणूस' मधील एन्ट्रीने तर चाहते खूपच खुश झाले होते. अलिकडेच गौतमी पाटीलचे 'सुंदरा' हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी भरपूर पसंती दिली आहे.

Gautami Patil New Song
Son Of Sardaar 2 Release Date : अजय देवगणच्या 'सन ऑफ सरदार २'ची तारीख बदलली, 'या' चित्रपटासोबत होणार कांटे की टक्कर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com