Sonu Sood: १४ वर्षीय गायत्रीला सोनू सुदने दिला मदतीचा हात! दृष्टी गमावलेल्या मुलीच्या आयुष्यात आणला प्रकाश

Helping Hand Sonu Sood: गरीबांना मदत करणारा रिअल हिरो म्हणून सोनू सूदला ओळखले जाते.
entertainment news
Sonu Sood Saam Tv
Published On

निर्माता,अभिनेता सोनू सूद कायमच चर्चेत असतो. गरीबांना मदत करणारा रिअल हिरो म्हणून सोनू सूदला ओळखले जाते. सोनू सूद कायमच गरीबांच्या मदतीला धावून येत असतो. नुकतंच सोनू सूदने एका मुलीला मदत करत प्रेरणा दिली आहे.

entertainment news
Rinku Rajguru New Movie: रिंकू राजगुरूचा नवीन चित्रपट येतोय; सेटवरचे फोटो केले शेअर

गरीबांना मदत करणारा रिअल हिरो म्हणून ओळख असलेल्या अभिनेता सोनू सूदच्या मदतीमुळे कोपरगाव शहरातील गायत्री थोरात या मुलीला गमावलेली दृष्टी पुन्हा परत मिळाली आहे. गायत्रीच्या जीवनातील अंधकार दूर झाला असून तिच्या जीवनात पुन्हा नवा दिवस उजाडला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे राहणारी गायत्री दशरथ थोरात ही अडीच वर्षांची असताना तिच्या डोळ्यात चुना गेल्यामुळे तिचा डावा डोळा पूर्ण निकामी झाला होता तर उजव्या डोळ्याने देखील पुसटसं दिसत होतं. आता आपल्याला जन्मभर असंच राहावं लागणार याचे दुख गायत्रीला होते. अशातच अभिनेता सोनू सुद या गायत्रीच्या मदतीला धावून आला आहे.

entertainment news
Amitabh Bachchan : विठ्ठलाची मूर्ती पाहून बिग बींनी जोडले हात, व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल कौतुक

कोपरगाव येथील सोनू सूदचे मित्र विनोद राक्षे यांच्या मदतीने सोनूने पुढाकार घेतला आहे. सोनूच्या मदतीने महागडी डोळ्यांची शस्त्रक्रिया करून गायत्रीची गेलेली दृष्टी पुन्हा मिळाली आहे. गायत्रीला दृष्टी मिळावी यासाठी तिचे वडील दशरथ आणि भाऊ कार्तिक थोरात यांनी खूप प्रयत्न केले मात्र शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च असल्याने गायत्रीचे उपचार थांबले होते. सोनू सुदच्या उदारतेमुळे 14 वर्षीय गायत्रीच्या जिवनात प्रकाश आला आहे.

entertainment news
Bigg Boss 18 : अविनाश अन् चाहतमध्ये वादावादी; सलमान खानने दोघांनाही फटकारले, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com