Sonakshi Sinha
Sonakshi Sinha

Sonakshi Sinha: सर्वात जास्त काळ प्रेग्नेंसीचा वर्ल्ड रेकॉर्ड...; सोनाक्षी सिन्हाने प्रेग्नेंसीच्या अफवांवर दिली खास प्रतिक्रिया

Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हा ही अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे जी नेहमीच स्वतःबद्दलच्या अफवांवर प्रतिक्रिया देते. सोनाक्षीने प्रेग्नेंसीच्या अफवांवर एक खास प्रतिक्रिया दिली आहे.
Published on

Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हा ही अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे जी नेहमीच स्वतःबद्दलच्या अफवांवर प्रतिक्रिया देते. ती ट्रोलर्सना योग्य उत्तर देण्यास मागेपुढे पाहत नाही. गेल्या काही दिवसांपासून सोनाक्षीच्या गरोदरपणाच्या अफवा पसरत आहेत, यावर अभिनेत्रीने प्रतिक्रिया देत सर्वांनाचं थक्क केलं आहे.

सोनाक्षीची पोस्ट

सोनाक्षीने भारतीय लूकमधील स्वतःचे फोटो शेअर केले. फोटो शेअर करताना सोनाक्षीने लिहिले, "मानवी इतिहासातील सर्वात जास्त काळ प्रेग्नेंसी (आपल्या प्रिय आणि अति-बुद्धिमान माध्यमांनुसार) या दिवाळीत सगळ्यांनी शाईन करा."

Sonakshi Sinha
Box Office Collection: 'कांतारा: चॅप्टर १' ची बॉक्स ऑफिसवर तुफान क्रेझ; ५०० कोटींच्या क्लबमध्ये लवकरच करणार एन्ट्री

झहीरने मस्करी केली

बुधवारी, एका कार्यक्रमादरम्यान, जेव्हा सोनाक्षी आणि तिचा पती झहीर इक्बाल यांचे पापाराझीं फोटो काढत होते तेव्हा झहीरने मस्करीत अभिनेत्रीच्या पोटाला स्पर्श केला आणि म्हणाला, "आराम करा." सोनाक्षी त्याला मस्करीत मारले मारते. दोघेही अप्रत्यक्षपणे प्रेग्नेंसीच्या बातम्या खोट्या ठरवल्या.

Sonakshi Sinha
Highest Collection Movie in India: २०२५ मधील आतापर्यंतचे ७ सर्वात मोठे हिट चित्रपट? कोणत्या फिल्मीने केली जास्त कमाई

कामाबाबतीत

सोनाक्षी येत्या काळात जटाधारा या चित्रपटात दिसणार आहे, यामध्ये सुधीर बाबू आणि दिव्या खोसला यांच्यासोबत ती काम करणार आहेत. हा चित्रपट ७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com