Solapur News : "सॉरी पब्लिक, मी खूप मोठा निर्णय घेतलाय..."; प्रसिद्ध रीलस्टारनं आयुष्य संपवलं, नेमकं कारण काय?

Reel Star Death : सोलापूरमध्ये भयंकर घटना घडली आहे. रील स्टारने गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.
Reel Star Death
Solapur News SAAM TV
Published On
Summary

सोलापूरमधील एका रील स्टारने आपले आयुष्य संपवलं आहे.

आयुष्य संपवण्याआधी त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

तरुणाच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

विश्वभूषण लिमये, सोलापूर

आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण प्रसिद्ध होत आहेत. काहींना या प्रयत्नात यश मिळते ते काहींना अपयशाला सामोरे जावे लागते. अशात आता एका रीलस्टारच्या आत्महत्येची घटना समोर आली आहे. सोलापुरमध्ये राहणाऱ्या 21 वर्षीय मुलाने आपले आयुष्य संपवले आहे. आयुष्य संपवण्या आधी या तरूणाने इन्स्टाग्राम दोन फोटो पोस्ट करून मेसेज लिहिला. प्रज्वल बसवराज कैनुरे असे या तरूणाचे नाव आहे.

सोलापुरच्या तरुणाने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोलापूर येथील शेळगी परिसरात मित्र नगरात घडली. बुधवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास ही घटना घडली. सोलापुरच्या तरुणाने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करून त्यावर 'आज हम है, कल हमारी याद होगी' जब हम ना होगे हमारी बाते होगी....असा संदेश लिहिला आहे.

प्रज्वलने गळफास घेतल्याचे समजताच त्याच्या कुटुंबियांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी प्रज्वलला तपासून मृत घोषित केले. प्रज्वलच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रज्वलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.

Prajwal kainure
Prajwal kainureinstagram

प्रज्वल काम काय करायचा?

मिळालेल्या माहितीनुसार प्रज्वल सोलापूरमध्ये मार्केट यार्ड येथे काम करत होता. तसेच तो कामासोबत सोशल मीडियावर रील देखील बनवत होता. त्याचे इन्स्टाग्रामवर 4,356 फॉलोअर्स होते. तो अविवाहित असून त्याच्या पश्चात कुटुंबात आई आणि एक लहान भाऊ आहे.

Prajwal kainure
Prajwal kainureinstagram

शेवटची पोस्ट

"सॉरी पब्लिक

माफ करा मित्रानों खूप मोठा निर्णय घेतला आहे मी...माझ्या आईची माझ्या भावाची काळजी घ्या हेच माजी इच्छा आहे..."

Reel Star Death
Badshah Photos: सुजलेला डोळा अन् मलमपट्टी; 'बादशाह'वर झाली शस्त्रक्रिया, सेटवर घडली होती भयंकर घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com