Solapur News: उसाचं बिल थकलं, युवा शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं, न्यायासाठी कुटुंबियांनी फोडला टाहो

Solapur Farmer End his life: गोकुळ साखर कारखान्याकडून उसाची थकबाकी न मिळाल्याने सोलापूरमधील अक्कलकोट येथील २८ वर्षीय शेतकऱ्याचा विष प्राशन करून मृत्यू झाला. त्याचे कुटुंब आणि उद्धव सेना न्यायाची मागणी करत आहे.
Solapur News
Solapur Farmer End his lifesaam tv
Published On
Summary
  • अक्कलकोट तालुक्यातील २८ वर्षीय सुनील कुंभार यांनी विष पिऊन आत्महत्या केली.

  • उसाचे बिल गोकुळ शुगर कारखान्याकडे थकीत असल्याने कर्ज वाढले.

  • दहा दिवस उपचारानंतर आज मृत्यू झाला.

  • कुटुंबीय आणि उद्धव सेना न्यायासाठी आंदोलन करत आहेत.

विश्वभूषण लिमये, साम प्रतिनिधी

सोलापूरमध्ये एका २८ वर्षीय युवा शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीय. सुनील चौडप्पा कुंभार असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सुनील कुंभार अक्कलकोट तालुक्यातील रहिवाशी होते. मिळालेल्या माहितीनुसार, सुनील कुंभार हे कर्जामुळे नैराश्यात गेले होते. त्या नैराश्यापोटी दहा दिवसापूर्वी त्यांनी विषारी पदार्थाचे सेवन केले होते.

उसाचे बिल थकीत असल्यानं त्यांच्यावर कर्ज झालं होतं. त्यामुळे ते नैराश्यात गेले होते. अक्कलकोट तालुक्यातील गोकुळ शुगर कारखान्याकडे बिल थकीत आहे. उसाचे बिल मिळत नसल्यानं त्यांनी विषाचे सेवन केलं होतं. ही बाब समजल्यानंतर सुनील कुंभार यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर उपाचर सुरू होते. आज त्यांचा मृत्यू झालाय. या घटनेनंतर कुटुंबीय आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत पीडित कुटुंबीयांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईक आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भूमिका घेतलीय.

Solapur News
Nashik News : बायको १०० फूट विहिरीत पडली, नवऱ्याने विचार न करात मारली उडी, मालेगावातील थरारक घटना

 कर्जबाजारीपणामुळे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

काही दिवसापूर्वी नांदेडमध्ये एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली होती. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि आर्थिक अडचणींना कंटाळलेल्या एका २७ वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल भीमराव बेदरे असे आत्महत्या करणाऱ्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. कुटुंबाची हालाखीची परिस्थिती, अंथरुणाला खिळलेले वडील, स्टेट बँकेचे कर्ज, साडेतीन एकर कोरडवाहू शेती या साऱ्या गोष्टींचा भार राहुल बेदरे यांच्या खांद्यावर होता. त्या नैराश्यातून राहुल बेदरे याने आत्महत्या केलीय.

Solapur News
Navapur News : खदानीत पोहायला गेले असता घडले भयंकर; महिलांच्या मदतकार्याने एकाला जीवदान, एकाचा बुडून मृत्यू

नेत्यांच्या वादग्रस्त विधानात गुरफटलेल्या सरकारचं राज्यातील बळीराजाकडे कानाडोळा केल्याचं दिसत आहे. कर्जबाजारीपणामुळे नैराश्यात गेलेले शेतकरी टोकाचा निर्णय घेत आहेत. पण सरकार अद्यापही कर्जमाफीचा निर्णय घेत नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com