Pune: ससून रुग्णालयात मनोरुग्णाची आत्महत्या, ११ व्या मजल्यावरून मारली उडी; नेमकं काय घडलं?

Sassoon Hospital Tragedy: पुण्यातील रूग्णालयाच्या ११ व्या मजल्यावरून तरूणानं उडी मारून आत्महत्या केली. बंडगार्डन पोलिसांकडून अधिक तपास सुरू.
Pune News Mentally Ill Patient Jumps to Death
Pune News Mentally Ill Patient Jumps to DeathSaam
Published On
Summary
  • पुण्यात भयंकर घडलं.

  • मनोरूग्णानं आयुष्य संपवल.

  • ससून रूग्णालयाच्या ११ व्या मजल्यावरून उडी घेतली.

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ससून रूग्णालयात एका मनोरूग्णानं आत्महत्या केली आहे. ११ व्या मजल्यावरून उडी घेऊन त्यानं आयु्ष्य संपवलं. याआधीही या तरूणानं रेल्वेसमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, आज त्यानं इमारतीवरून उडी घेत आयुष्य संपवलं. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय असे मनोरूग्णाचे नाव आहे. त्यानं ५ सप्टेंबर रोजी रेल्वेसमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर स्थानिकांनी पाहिलं. स्थानिकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी विजयला वाचवलं. यानंतर पोलिसांनी त्याला ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

Pune News Mentally Ill Patient Jumps to Death
२ लाख शेतकऱ्यांच्या तोंडचा घास गेला, १५६ जनावरं दगावली; अतिवृष्टीमुळे ८ जणांचा मृत्यू, सोलापूरात पावसांचं रौद्ररूप

मात्र, आज सकाळी त्यानं पुन्हा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. विजयने ससून रुग्णालयाच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारत आयुष्य संपवलं. उंचीवरून उडी घेतल्यामुळे तो रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडला होता. याबाबतची माहिती पोलिसांना तातडीने माहिती देण्यात आली.

Pune News Mentally Ill Patient Jumps to Death
ड्रग्ज विकणाऱ्याला हटकलं, काँग्रेस नेत्यावर कोयत्याने सपासप वार, उल्हासनगर हादरले

माहिती मिळताच बंडगार्डन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन रूग्णालयात पाठवले. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com