
Vishal Dadlani : प्रसिद्ध संगीतकार आणि गायक विशाल ददलानीने लोकप्रिय सिंगिंग रिअॅलिटी शो 'इंडियन आयडल' ला कायमचा निरोप दिला आहे. त्यांने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून या निर्णयाची माहिती दिली. विशाल गेल्या सहा सीझनपासून या शोसाठी जज म्हणून काम करत होता आणि त्यांच्या या निर्णयाने चाहत्यांमध्ये आश्चर्य आणि भावनिक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
विशाल ददलानीने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, "माझ्याकडे आता एवढंच आहे मित्रांनो! सलग सहा सीझननंतर, आज रात्री 'इंडियन आयडल' मध्ये जज म्हणून माझा शेवटचा एपिसोड आहे. मला आशा आहे की शोला माझी तितकीच आठवण येईल जितकी मला या शोची येईल." त्याने त्याच्या सहकाऱ्यांचे आणि प्रेक्षकांचे आभार मानत पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. शोचा होस्ट आदित्य नारायणने लिहिले, "एका युगाचा अंत. इंडियन आयडल तुमच्याशिवाय कधीच तसाच राहणार नाही, मोठ्या भावासारखे. एकत्र घालवलेल्या सर्व उत्तम क्षणांसाठी आभारी आहे." रॅपर बादशाहने त्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत लिहिले, "जाऊ देणार नाही तुम्हाला."
विशाल ददलानीने 'इंडियन आयडल' मधून बाहेर पडण्याचे कारण स्पष्ट केले नाही, परंतु त्याने सांगितले की आता तो संगीत निर्मिती आणि कॉन्सर्ट्सवर अधिक लक्ष केंद्रित करतील. त्याच्या या निर्णयामुळे शोमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, आणि प्रेक्षकांना त्यांच्या उणिवेची जाणवेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.