Armaan Malik Engagement: तुझी माझी जोडी जमली.... ; प्रसिद्ध गायक अरमान मलिकचा साखरपुडा दणक्यात, Photo Viral

Armaan Malik And Aashana Shroff Engagement: बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक अरमान मलिकने नुकताच चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून गुड न्यूज दिली आहे.
Armaan Malik And Aashana Shroff Engagement
Armaan Malik And Aashana Shroff EngagementTwitter
Published On

Armaan Malik Get Engaged

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक अरमान मलिकने नुकताच चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून गुड न्यूज दिली आहे. नुकतंच गायकाने त्याच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर त्याची गर्लफ्रेंड आशना श्रॉफसोबत साखरपुडा करुन त्याचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केलेत. दोघांनीही साखरपुडा ८ ऑगस्ट रोजी केला आहे. अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना नुकताच सोशल मीडियावरून फोटो शेअर करत ‘गुड न्यूज’ दिली आहे.

Armaan Malik And Aashana Shroff Engagement
Dipika Kakar Vlog: अचानक अभिनेत्रीची तब्येत बिघडली: मध्यरात्रीच दीपिका कक्कर हॉस्पिटलमध्ये

२८ वर्षीय अरमान मलिकने इंस्टाग्रामवर एंगेजमेंटचे फोटो पोस्ट करत कॅप्शन दिले की, “आणि आता आम्ही कायमचे एकत्र राहणार...” शेअर केलेल्या या फोटोमध्ये, अरमान त्याची गर्लफ्रेंड आशना श्रॉफला एंगेजमेंट रिंग घालताना दिसत आहे. त्याचवेळी तो आशनाला गुडघ्यावर बसून प्रपोज करताना दिसत आहे. अरमान मलिकने 'जेहर', 'बोल दो ना जरा', 'पहेला प्यार', 'मुझको बरसात बना लो' ते 'मैं राहून या ना राहून' अशा अनेक सुपरहिट गाण्यांमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली.

अरमान आणि आशना यांच्या रोमँटिक फोटोवर अनेक सेलिब्रिटींसह त्यांच्या चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. ईशा गुप्ता, झरीन खान, नीती मोहन, तारा सुतारिया, आहाना कुमरा ते टायगर श्रॉफ पर्यंत अनेक सेलिब्रिटींनी त्यांना सोशल मीडियावर कमेंट्सच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव केला. (Bollywood Actor)

Armaan Malik And Aashana Shroff Engagement
Shashank Shende Poem: 'तो म्हणजे बाप...' शशांक शेंडेंची हृदयस्पर्शी कविता; उपस्थितांचेही डोळे पाणावले, व्हिडिओ पाहाच!

आशना श्रॉफ एक प्रसिद्ध युट्युबर, ब्लॉगर, सोशल मीडिया सेलिब्रिटी म्हणून तिची सर्वत्र ओळख आहे. ती फॅशन आणि ब्यूटी प्रॉडक्ट संबंधित ब्लॉग बनवते. आशनाने लंडनमधून फॅशन आणि मॉडेलिंगचे शिक्षण घेतले आहे. अभिनेत्रीचा जन्म ४ ऑगस्ट १९९३ रोजी झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com