सलमान खानचा (Salman Khan ) 'सिकंदर' (Sikandar) 30 मार्चला रिलीज झाला. सलमान खान आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. यांच्यासोबत चित्रपटात काजल अग्रवाल, शरमन जोशी, प्रतिक बब्बर आणि सत्यराज या कलाकारांनी देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आज चित्रपट रिलीज होऊन आठ दिवस पूर्ण झाले आहेत. आठ दिवसात चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.
सलमान खानचा 'सिकंदर' (Sikandar Box Office Collection) चित्रपटाने अखेर 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. रिलीजच्या आठ दिवसात चित्रपटाने हे यश गाठले आहे. 'सिकंदर' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दोन दिवस बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली. सर्वात जास्त कलेक्शन ईदच्या दिवशी झाले. 'सिकंदर' चित्रपटाने आठव्या दिवशी किती कोटींची कमाई केली जाणून घेऊयात.
पहिला दिवस - 26 कोटी
दुसरा दिवस - 29 कोटी
तिसरा दिवस - 19.5 कोटी
चौथा दिवस - 9.75 कोटी
पाचवा दिवस - 8.28 कोटी
सहावा दिवस - 3.75 कोटी
सातवा दिवस - 3.28 कोटी
आठवा दिवस - 4.50 कोटी
एकूण - 102.25 कोटी
'सिकंदर' चित्रपटाने आठ दिवसात तब्बल 102.25 कोटींचा व्यवसाय केली आहे. 'सिकंदर' हा अॅक्शन ड्रामा आहे. भाईजानच्या 'सिकंदर'चा बजेट 180 कोटी आहे. 'सिकंदर' चित्रपटाचे दिग्दर्शन ए. आर. मुरुगदास (AR Murugadoss) यांनी केले आहे. 'सिकंदर'चे ओटीटी राइट्स नेटफ्लिक्सने खरेदी केले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, तब्बल 85 कोटींना नेटफ्लिक्सने राइट्स खरेदी केले आहेत. भाईजानचा 'सिकंदर' चित्रपट 11 ते 25 मे दरम्यान नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार असल्याचा अंदाज आहे. मात्र अद्याप कोणतीही ओटीटी रिलीज डेट निश्चित झालेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.