Sikandar Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर सलमानच्या 'सिकंदर'ची जादू फेल, ६व्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

Sikandar Box Office Collection Day 6 : सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये सतत घट होताना पाहायला मिळत आहे. चित्रपटाने रिलीजच्या सहाव्या दिवशी किती कोटींची कमाई केली जाणून घेऊयात.
Sikandar Box Office Collection Day 6
Sikandar Box Office CollectionSAAM TV
Published On

बॉलिवूडचा भाईजान (Salman Khan) सध्या त्याच्या 'सिकंदर' (Sikandar ) चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. 'सिकंदर' रिलीज होऊन आता सहा दिवस पूर्ण झाले आहे. 'सिकंदर' च्या कमाईत दिवसेंदिवस घट होताना पाहायला मिळत आहे. 'सिकंदर' हा ॲक्शन ड्रामा आहे. या चित्रपटातील गाण्यांनी तर चाहत्यांना वेड लावले आहे. सोशल मीडियावर गाण्यांची हवा पाहायला मिळत आहे.

'सिकंदर' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 6

सलमान खानच्या (Salman Khan) 'सिकंदर' चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये झपाट्याने घसरण होताना पाहायला मिळत आहे. चित्रपटाने पहिल्या दोन दिवशी बंपर कमाई केली. मीडिया रिपोर्टनुसार, 'सिकंदर' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 26 कोटींची कमाई, दुसऱ्या दिवशी 29 कोटी, तिसऱ्या दिवशी 19.5, चौथ्या दिवशी 9.75 आणि पाचव्या दिवशी 8.28 कोटींचा व्यवसाय केला आहे.

'सिकंदर' 30 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटाची ईदच्या दिवशी भरपूर कमाई झाली. मात्र आता कलेक्शनच्या आकड्यात घट होताना पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'सिकंदर' चित्रपटाने रिलीजच्या सहाव्या दिवशी 3.75 कोटींचा व्यवसाय केला आहे. आतापर्यंत सहा दिवसात 'सिकंदर'ची कमाई तब्बल 94.00 कोटी रुपये झाली आहे. भाईजानचा 'सिकंदर' अजूनही 100 कोटींचा टप्पा पार करू शकला नाही आहे. अद्याप 'सिकंदर'ने चित्रपटाचे बजेट वसूल केले नाही आहे.

सलमान खानने सांगितल्यानुसार 'सिकंदर' चित्रपट नक्कीच 100-200 कोटींचा टप्पा पार करेल. 'सिकंदर'चा बजेट 180 कोटी आहे. 'सिकंदर' चित्रपटाचे दिग्दर्शन ए. आर. मुरुगदास यांनी केले आहे. 'सिकंदर' चित्रपटात सलमान खानसोबत साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) झळकली आहे.

सलमान आणि रश्मिकासोबत चित्रपटात काजल अग्रवाल, शरमन जोशी, प्रतिक बब्बर आणि सत्यराज हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. चित्रपटातील सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे. मात्र अद्यापही 'सिकंदर' ने 100 कोटींचा टप्पा पार केला नाही आहे. 'सिकंदर' आता वीकेंडला किती कोटींचा व्यवसाय करतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Sikandar Box Office Collection Day 6
Sikandar box office collection day 5: सलमान खानच्या 'सिकंदर'ची घसरण, १,१०० शो रद्द, पाच दिवसात फक्त 'इतके' कोटीच कमावले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com