Shubhankar Tawde
Shubhankar Tawde

Shubhankar Tawde: क्रेझी 'किया' रे! वाढदिवसाला अभिनेत्याने स्वत: दिलं गिफ्ट; अलिशान कारचे फोटो पाहिलेत का?

Shubhankar Tawde New Car: वाढदिवस हा प्रत्येकासाठी खास असतो. अभिनेता शुभंकर तावडेने नवीन कार घेतली आहे.
Published on

मराठमोळा अभिनेता शुभंकर तावडे आज त्याचा ३० वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने स्वत:ला खास भेटवस्तू दिली आहे. वाढदिवस हा प्रत्येकासाठी खास असतो. अभिनेता शुभंकर तावडेने नवीन कार घेतली आहे.

Shubhankar Tawde
Urfi Javed: उर्फीचा स्क्रू ढिल्ला; नव्या लूकची होतेय तुफान चर्चा, Video व्हायरल

शुभंकर तावडेने त्याचा वाढदिवस साजरा केला आहे. या वाढदिवसानिमित्त त्याने कार खरेदी केली आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शुभंकरने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नवीन कारचे फोटो शेअर करत शुभंकरने कॅप्शनमध्ये, "नवीन कार घेतली, तिचे नाव ‘लक्ष्मी’ ठेवलं, मी तिला आवडीने ‘फनकार’ किंवा ‘फन-कार’ म्हणतो. माझे आगामी नाटक ‘विशामृत’ झालं. खूप शुभेच्छा मिळाल्या आणि पार्टी झाली. आनंद झाला." शुभंकरच्या फोटोंवर त्याच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शुभंकर तावडे हा मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता आहे. शुभंकरने अनेक चित्रपट- मालिकांमध्ये काम केले आहे. 'डबल सीट' या चित्रपटातून त्याने अभिनयाची कारकीर्द सुरू केली. यानंतर 'कागर' चित्रपटात त्याने अभिनेत्री रिंकू राजगुरूसोबत दिसला होता. रितेश- जेनेलियाच्या वेड मध्येही त्याने काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com