Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरचा बॉयफ्रेंड बघितला का? पहिल्यांदाच दिली प्रेमाची कबुली? रोमँटिक फोटो केला शेअर

Shraddha Kapoor Share Photo With Boyfriend: श्रद्धा कपूर ही नेहमी चर्चेत असते. श्रद्धा कपूर सध्या तिच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली आहे.श्रद्धाने नुकताच बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केला आहे.
Shraddha Kapoor Share Photo With Boyfriend
Shraddha Kapoor Share Photo With BoyfriendSaam Tv

श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. श्रद्धा कपूर नेहमी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते. श्रद्धा अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. सोशल मीडियावर श्रद्धाच्या रिलेशनशिपबद्दल चर्चा सुरु आहेत. त्यातच आता श्रद्धाने तिच्या कथित बॉयफ्रेंडसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. त्यामुळे श्रद्धाने अधिकृतपणे रिलेशनशिपची घोषणा केली असल्याचे म्हटले जात आहे.

श्रद्धा नेहमी तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असायची. श्रद्धा अनेकदा बॉफ्रेंड राहुल मोदीसोबत एकत्र दिसली आहे. अनेकदा ते दोघे एकत्र फिरायला गेल्याचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. परंतु त्या दोघांनीही कधीच आपल्या प्रेमाची कबुली दिली नाही. परंतु आता पहिल्यांदाच श्रद्धाने राहुलसोबतचा फोटो शेअर केला आहे. श्रद्धाने राहुलसोबतचा फोटो पोस्ट करत 'हृदय ठेवून घे, पण माझी झोप मला परत दे', असं मजेशीर कॅप्शन दिले आहे. या फोटोवर तिने राहुलला टॅगदेखील केलं आहे. या फोटोवर तिने बॅकग्राउंडला 'नींद चुराई मेरी किसने ओ सनम...' हे गाणं लावले आहे. त्यामुळे आता श्रद्धाच्या नात्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे.

श्रद्धा कपूरने हा फोटो पोस्ट करत ती रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहीर केल्याच्या चर्चा सुरु झाल्यात आहेत. श्रद्धा कपूर आणि राहुल अनेकदा एकत्र फिरायला गेले होते. मात्र, त्यांनी एकत्र कधीच फोटो शेअर केले नव्हते. परंतु एकाच ठिकाणी फोटोशूट केले होते.त्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. तसेच काही फोटोंमध्ये श्रद्धाच्या गळ्यात 'आर' नावाचे पेडंटदेखील घातल्याचे दिसत आहे.

Shraddha Kapoor Share Photo With Boyfriend
Kiran Mane Post: 'गृहमंत्री महोदय खुर्ची सोडा, राजीनामा द्या', वसईत भररस्त्यात तरुणीची हत्या, किरण माने संतापले

श्रद्धा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, श्रद्धा लवकरच स्त्री २ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर राहुल मोदी हा लेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करतो. त्याने प्यार का 'पंचनामा २', 'सोनू की टीटू की स्वीटी' या चित्रपटांचे लेखन केले आहे.

Shraddha Kapoor Share Photo With Boyfriend
Alka Yagnik: ट्रेनमध्ये पहिली भेट, लग्नाचा निर्णय; आज राहतात पतीपासून दूर; कोण आहेत अलका याज्ञिक यांचे पती?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com