Eetha Release Date Change: रॉकिंग स्टार यशच्या बहुप्रतीक्षित 'टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स' या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाल्यानंतर बॉक्स ऑफिसचे गणितच बदलल्याचे चित्र दिसत आहे. २६ ऑगस्ट २०२६ रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटामुळे अनेक निर्माते आपल्या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा बदलण्याचा विचार करत आहेत. आता या यादीत अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या 'ईठा' या चित्रपटाचाही समावेश झाला आहे.
मूळत: 'ईठा' हा चित्रपट २८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, यशच्या 'टॉक्सिक'शी थेट टक्कर टाळण्यासाठी चित्रपटाचे निर्माते मॅडॉक फिल्म्स रिलीज डेट पुढे किंवा मागे ढकलण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. नवीन तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी २८ ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याची चर्चा रंगली आहे.
'केजीएफ २'च्या बॉक्स ऑफिसवरील कमाईनंतर यशची लोकप्रियता देशभरात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे 'टॉक्सिक'बद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अशा परिस्थितीत कोणताही मोठा चित्रपट त्याच्याशी थेट स्पर्धा करण्याचा धोका घेणार नसल्याचे चित्र दिसत आहे.
याआधी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या 'व्हॅन' या चित्रपटाची रिलीज डेटही बदलण्यात आली. सुरुवातीला हा चित्रपट २८ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. मात्र 'टॉक्सिक' आणि 'ईठा'शी होणारी टक्कर टाळण्यासाठी निर्मात्यांनी तो २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत पुढे ढकलला. आता 'ईठा'ची रिलीज डेट बदलण्याची चर्चा सुरू झाल्याने 'टॉक्सिक'ची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
'ईठा'चे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. 'छावा'नंतर त्यांचा हा त्यांचा आणखी एक महत्वाचा चित्रपट आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर प्रसिद्ध मराठी लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या भूमिकेत झळकणार आहे. तिच्यासोबत रणदीप हुड्डा आणि मोहम्मद झीशान अय्युब यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.