Shiv Thakare Get Injured : स्टंट करताना शिव ठाकरेला गंभीर दुखापत ; नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर

Khatron Ke Khiladi 13 : खतरों के खिलाडी 13 शेवटच्या टप्प्यात आल्याची माहिती शिव ठाकरेने नुकतीच दिली होती.
Shiv Thakare Share Video and Show his Injury
Shiv Thakare Share Video and Show his InjuryInstagram @shivthakare9
Published On

Shiv Thakare Share Video and Show his Stitches : 'खतरों के खिलाडी 13' हा शो लवकरच टीव्हीवर प्रसारित होणार आहे. या शोशी संबंधित अनेक अपडेट्स नेहमीच समोर येत असतात. खतरों के खिलाडी 13 शेवटच्या टप्प्यात आल्याची माहिती शिव ठाकरेने नुकतीच दिली होती. यासोबतच शिव टॉप 8 मध्ये पोहोचल्याचेही संकेत मिळाले आहेत. शिवबाबत आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

रोहित शेट्टीने शोचा प्रोमो शेअर करताना सांगितले होते की, यावेळी स्टंटची पूर्वीपेक्षा जास्त धोकादायक असणार आहेत. आतापर्यंत जी माहिती समोर आली आहे, ते पाहता स्टंट खरंच खूप डेंगर्स स्टंट असल्याचे दिसले. नुकताच शिव ठाकरेंचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याने स्टंट करताना दुखापत झाल्याचे सांगितले.

Shiv Thakare Share Video and Show his Injury
Harish Magon Passes Away: बॉलिवूडवर दु:खाचा डोंगर; ‘गोल माल’फेम अभिनेत्याचे निधन, वयाच्या ७६ व्या वर्षी अखेरचा श्वास

शिवाच्या बोटाला दुखापत झाली. दुखापत इतकी गंभीर आहे की त्याच्या बोटाला टाके पडले आहेत. त्याचा हा व्हिडिओ शिवाने इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या बोटांचा क्लोज-अप दाखवताना दिसत आहे. त्याच्या बोटावर एक नाही तर अनेक टाके दिसतात. शिवाची ही अवस्था पाहून अनेक चाहत्यांनी त्याचे कौतुक करत त्याला योद्धा म्हटले आहे.

'खतरों के खिलाडी 13' मधून स्पर्धकांना दुखापत झाल्याची ही पहिलीच बातमी नाही. यापूर्वी अर्चना गौतम आणि ऐश्वर्या शर्मा या टास्क परफॉर्मन्सदरम्यान जखमी झाल्या होत्या. तर टास्क पूर्ण करताना राहुल रॉय इतका गंभीर जखमी झाला होता की, त्याला केपटाऊनमधून मुंबईला हलवावे लागले होते. (Latest Entertainment News)

नुकतेच शिव ठाकरे यांनी अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये त्यांनी 'खतरों के खिलाडी 13'चे शूटिंग संपल्याची माहिती दिली आहे. शेवटच्या दिवसाचे शूटिंग संपवून तो बाकीच्या स्पर्धकांसोबत परत जात होता. त्या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या शर्मासह इतर स्पर्धक दिसत होते.

'खतरों के खिलाडी 13' ऑन एअर जुलैच्या मिड वीकमध्ये होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा शो कलर्स वाहिनीवर प्रसारित होणार आहे. मात्र, निर्मात्यांच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com