Harish Magon Passes Away: बॉलिवूडवर दु:खाचा डोंगर; ‘गोल माल’फेम अभिनेत्याचे निधन, वयाच्या ७६ व्या वर्षी अखेरचा श्वास

Harish Magon Death: ज्येष्ठ अभिनेते हरिश मॅगन यांनी वयाच्या ७६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.
Harish Magon Death
Harish Magon DeathSaam Tv
Published On

Harish Magon Dies: बॉलिवूड इंडस्ट्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ज्येष्ठ अभिनेते हरिश मॅगन यांनी वयाच्या ७६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. अभिनेत्याचे १ जुलै रोजी निधन झाले आहे. हरिश मॅगन यांच्या पश्चात पत्नी पूजा, मुलगा सिद्धार्थ आणि मुलगी आरुषी असा परिवार आहे.

Harish Magon Death
Marathi Celebrity On Maharashtra Politics: राज्यातील राजकीय भूकंपाचे मनोरंजन क्षेत्रालाही हादरे, कलाकारांनी व्यक्त केली परखड मतं

हरिश मॅगनयांच्या कामाबद्दल बोलायचे तर, त्यांनी ‘गोल माल’, ‘नमक हलाल’ आणि ‘इंकार’ सारख्या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारली. मॅगन यांचा फिल्मी कारकिर्दितील अखेरचा चित्रपट ‘उफ! ये मोहब्बत’ हा चित्रपट ठरला. त्यांचा हा चित्रपट १९९७ मध्ये प्रदर्शित झाला होता. हरिश यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

हरिश मॅगन यांचा जन्म ६ डिसेंबर १९४६ रोजी मुंबईत झाला. १९७४ मध्ये त्यांनी FTII पुणे येथून पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी फिल्मी दुनियेत प्रवेश केला. ९०च्या दशकातील अनेक हिट चित्रपटांमध्ये हरिश मॅगन यांनी सहाय्यक भूमिकेत काम करणाऱ्या उल्लेखनीय अभिनेत्यांमध्ये त्यांचे नाव नेहमीच अग्रस्थानी होते.

Harish Magon Death
Sai Tamhankar Birthday: सई सर्वात महागडी अभिनेत्री, एका चित्रपटासाठी इतके मानधन

१९७४ मध्ये ग्रॅज्युएशन पुर्ण केल्यानंतर, पुढच्या वर्षी अर्थात १९७५ मध्ये अभिनेत्याने ‘चुपके चुपके’ चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर आँधी, नमक हलाल, चुपके चुपके, खुशबू, इंकार, मुकद्दर का सिकंदर, गोल माल आणि शहेनशाह या सर्वाधिक हिट ठरलेल्या चित्रपटांमधून आपल्या भरंदाज अभिनयाचा ठसा उमटवला.

१९९७ मध्ये विपिन हांडा दिग्दर्शित ‘उफ! ये मोहब्बत’ हा हरीश यांचा अखेरचा चित्रपट ठरला. १९९७ नंतर हरिश यांनी अभिनयक्षेत्रातून निवृत्ती घेतल्यानंतर ते मुंबईतील जुहू येथे ‘हरीश मगोन ॲक्टिंग इन्स्टिट्यूट’ या नावाने चित्रपट प्रशिक्षण संस्था चालवत होते.

हरीश मॅगन यांच्या निधनाची बातमी कळताच अनेक अभिनेत्यांसह हरिश यांच्या चाहत्यांनीही श्रद्धांजली वाहिली आहे. सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने अर्थात (CINTAA) हरीश मॅगन यांच्या निधनाची बातमी ट्विटरवर शेअर केली. असोसिएशनने शेअर केलेल्या पोस्टमध्ये हरिश १९८८ पासून या संघटनेचे सदस्य असल्याचं दिसत आहेत. “CINTAA हरीश मॅगन (जून १९८८ पासून सदस्य) यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहेत.” असं त्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com