Shefali Jariwala: आज तुझी आठवण...; निधनाच्या आधी एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ शुक्लासाठी शेफालीने केली होती शेवटची खास पोस्ट

Shefali Jariwala Last Post: शेफाली जरीवालाने एक्स बॉयफ्रेंड आणि बिग बॉस १३ चा विजेता आणि सिद्धार्थ शुक्लासाठी शेवटची ट्विटर पोस्ट तिच्या मृत्यूनंतर व्हायरल झाली आहे.
Shefali Jariwala Last Post
Shefali Jariwala Last PostSaam Tv
Published On

Shefali Jariwala Last Post: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि 'बिग बॉस १३' फेम शेफाली जरीवाला, जी 'कांटा लगा' या प्रसिद्ध म्युझिक व्हिडिओसाठी प्रसिद्ध होती. ती आता या जगात नाहीत. वयाच्या ४२ व्या वर्षी शेफालीने या जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेत्रीच्या अचानक निधनाच्या बातमीने तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. २७ जूनच्या रात्री अचानक छातीत दुखण्यामुळे शेफालीचे निधन झाले. शेफालीच्या निधनानंतर, तिची शेवटची एक्स-पोस्ट व्हायरल होत आहे. जी तिने 'बिग बॉस १३' आणि एक्स-बॉयफ्रेंड सिद्धार्थ शुक्लासाठी लिहिली होती.

'बिग बॉस १३' मध्ये दोघे एकत्र होते

'बिग बॉस १३' चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे २०२१ मध्ये शेफाली जरीवालाप्रमाणेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दोघांच्याही मृत्यूंमध्ये आणखी एक गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे सिद्धार्थचा मृत्यू ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने झाला आणि शेफालीचेही ४२ व्या वर्षी निधन झाले. दोघेही अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते.

Shefali Jariwala Last Post
Shefali Jariwala: कांटा लगा फेम शेफाली आणि पती परागचे 'हे' खास फोटो पाहिलेत का?

सिद्धार्थसाठी शेवटची पोस्ट

शेफाली जरीवालाने सिद्धार्थ शुक्लासाठी तिच्या एक्स अकाउंटवर शेवटची पोस्ट केली. तिने सिद्धार्थच्या पुण्यतिथीनिमित्त ही पोस्ट केली. शेफालीने बिग बॉस दरम्यान दोघांच्याही मिठी मारतानाचा जुना फोटो ट्विटरवर शेअर केला.

Shefali Jariwala Last Post
Shefali Jariwala: शेफाली जरीवालासोबत रात्री काय घडले? वॉचमॅनने सांगितली सगळी हकीकत

या फोटोसोबत शेफालीने लिहिले, 'आज तुझी आठवण येतेय मित्रा @sidharth_shukla.' शेफालीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिद्धार्थसाठी ही तिची शेवटची पोस्ट असेल आणि त्याचा मृत्यूही हृदयविकाराने होईल असे कोणालाही वाटले नव्हते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com