Shefali Jariwala: कार्डियक अरेस्ट नाही 'या' कारणामुळे झाला शेफालीचा मृत्यू; वयाच्या १५ व्या वर्षापासून होता हा गंभीर आजार

Shefali Jariwala Death Reason: शेफाली जरीवालाच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका नाही तर हा गंभीर आजार आहेवयाच्या १५ व्या वर्षापासून ती या आजाराने ग्रस्त होती.
Shefali Jariwala Death Reason
Shefali Jariwala Death ReasonSaam tv
Published On

Shefali Jariwala Death Reason: 'कांटा लगा गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेफाली जरीवालाचे वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाले. २००२ मध्ये जेव्हा हे गाणे आले तेव्हा ते प्रत्येक तरुणाच्या मनावर शेफालीने स्थान मिळवले. अशा अभिनेत्रीचे अकाली निधन खूप दुःखद आहे. तिच्या मृत्यूची बातमी पसरताच, हृदयविकाराच्या झटक्याने तिचे निधन झाल्याची चर्चा सुरू झाली.

सुरुवातीच्या वृत्तांतात शेफाली जरीवालाच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे म्हटले गेले होते. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनीही एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, एका चांगली अभिनेत्रीने हृदयविकाराच्या झटक्याने आपल्याला सोडून गेली आहे. तथापि, मुंबई पोलिसांचे म्हणणे वेगळे आहे.

Shefali Jariwala Death Reason
Sitaare Zameen Par Day 8: 'सितारे जमीन पर'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरू; लवकरच गाठणार १०० कोटींचा टप्पा

एएनआयच्या दुसऱ्या अपडेटनुसार, मुंबई पोलिसांनी सांगितले की, तिचा मृतदेह अंधेरी परिसरातील तिच्या घरी सापडला. मुंबई पोलिसांना पहाटे १ वाजता माहिती मिळाली. तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कूपर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अशा परिस्थितीत तिच्या आजाराची चर्चा सुरू झाली आहे.

Shefali Jariwala Death Reason
Shefali Jariwala: शेफाली जरीवालासोबत रात्री काय घडले? वॉचमॅनने सांगितली सगळी हकीकत

शेफाली जरीवालाला हा आजार होता

शेफाली १५ वर्षांची असल्यापासून एका आजाराने ग्रस्त होती. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, तिने २०२० मध्ये टाईम्स ऑफ इंडिया टीव्हीला सांगितले होते की तिला एपिलेप्सीचा त्रास आहे. ताणतणाव आणि चिंतेमुळे अनेकदा झटके येतात. या समस्येमुळे तिचे वजन वाढले होते.

एपिलेप्सी म्हणजे काय?

एपिलेप्सी हा एक न्यूरोलॉजिकल आणि मेंदूचा आजार आहे. यामध्ये वारंवार झटके येऊ लागतात. मेयो क्लिनिकच्या मते, ही समस्या कोणालाही होऊ शकते. त्याचे कारण काही रुग्णांमध्ये दिसून येते तर काहींमध्ये नाही. प्रत्येक रुग्णामध्ये त्याची लक्षणे वेगवेगळी असू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com