Shruti Kadam
शेफाली जरीवालाचे (४२) २७ जून रोजी मुंबईतील बॅलिव्ह्यू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कार्डिएक अॅरस्टमुळे निधन झाले, पती पाराग त्यागी आणि काही मित्रांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले, पण तिथे तीला मृत घोषित केले
पाराग त्यागी, शोकाकुल मनाने हॉस्पिटल सोडताना दिसला.
शेफाली आणि पारागने काही वर्षांच्या डेटिंगनंतर २०१४ साली लग्न केले. पाराग पूर्वी ‘पवित्र रिश्ता’, ‘ब्रह्मराक्षस’, ‘जोधा अकबर’ अशा अनेक सीरियल्समध्ये दिसला आहे .
शेफालीचे पहिले लग्न मीट ब्रदर्समधील हर्मीत सिंगसोबत झालं होतं पण हे लग्न फार काळ टिकू शकले नाही.
सोशल मीडियावर पाराग आणि शेफाली दोघांचे रोमँटिक आणि आनंदाचे फोटो नेहमीच चर्चेत राहिले. त्यांच्या जोडीला “पार्किंग कपल गोल्स” म्हणायला हरकत नव्हती.
निधनाच्या तीन दिवस आधी शेफालीने एक ग्लॅमरस फोटो शेअर केला, ज्यात ती सिल्वर जंपसूटमध्ये होती. त्याला कॅप्शन म्हणून तिने Bling it on baby लिहीले होते.
शेफालीने लहान वयातच (१५ व्या वयात) एपिलेप्सीचा सामना केला आणि मानसिक आरोग्य समस्यांवर मात करत चित्रपटसृष्टीत हक्काचे स्थान मिळवले आहे.