Shahrukh Khan: चित्रपट करण्याला शाहरुख खानचा नकार, अंडरवर्ल्ड कडून जीवे मारण्याची धमकी नंतर..., नेमकं काय घडलं ?

Shahrukh Khan And Underworld: शाहरुख खानला एका चित्रपटाची ऑफर मिळाली होती, पण जेव्हा त्याला कळले की या चित्रपटात अंडरवर्ल्डचे पैसे गुंतवले आहेत, तेव्हा त्याने त्यात काम करण्यास नकार दिला.
Shah Rukh Khan
Shah Rukh Khan Saam Tv
Published On

Shahrukh Khan: हिंदी चित्रपट हा जगातील सर्वात भरभराटीचा चित्रपट उद्योग आहे. पण, एक काळ असा होता जेव्हा माफिया आणि अंडरवर्ल्डची बॉलिवूडवर वाईट नजर होती. बॉलिवूड मेगास्टार किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडीओमध्ये तो त्याला मिळालेल्या धमकी बद्दल बोलत आहे.

या व्हिडीओ मधील मुलाखतीत शाहरुख खान म्हणाला, 'हिंदी चित्रपटसृष्टी जगातील सर्वात मोठी चित्रपट निर्माण करणारी इंडस्ट्री आहे. शाहरुखने सांगितले की त्याला एक चित्रपट करण्यास सांगितले होते. जेव्हा त्याने विचारले की निर्माता कोण आहे, तेव्हा त्याला सांगण्यात आले की, ' एक मोठा माणूस आहे तू टेन्शन नको घेऊ फक्त चित्रपट करण्यासाठी साईन कर'

Shah Rukh Khan
Hrithik Roshan: हृतिकचा पहिला चित्रपट 'कहो ना प्यार है'ला 25 वर्षे पूर्ण, शेअर केल्या 27 वर्षांच्या जुन्या नोट्स, भावुक होऊन म्हणाला...

जेव्हा त्याने चित्रपटात काम करण्यास नकार दिला

शाहरुख खान म्हणाला, 'जर तुम्हाला जीवाची भीती वाटत असेल तर तुम्ही त्यावर सही करता पण तुम्ही जर तुमचे नशीब आजमावण्यास तयार असाल तर तुम्ही नकार द्याल आणि मी देखील तेच केलं' शाहरुखने चित्रपट करण्यास नकार दिला होता. अनेक माध्यमांमध्ये असेही सांगण्यात आले होते की जेव्हा किंग खानने नकार दिला तेव्हा त्याला जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या. शाहरुख खान मुलाखतीत कधी धमकी देण्यात आली आहे का? असे विचारले असता तो म्हणाला, 'हो, असे अनेक वेळा मला धमक्या मिळाल्या आहेत या धमक्यांमुळे मला तीन वर्षे पोलीस प्रोटेक्शन देखील मिळालं होतं.”

Shah Rukh Khan
Manoj Bajpayee: मला घाबरून...; मनोज वाजपेयीच्या 'सत्या' चित्रपटातील तो किस्सा आजही चर्चेत

१९९८ मध्ये बॉलिवूडला अधिकृतपणे उद्योगाचा दर्जा देण्यात आला. सुषमा स्वराज यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून काम पाहिले होते. त्यांनी १९९८ मध्ये चित्रपट निर्मितीला 'उद्योगाचा दर्जा' दिला. त्यामुळे चित्रपट उद्योग हा कायदेशीर झाला आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज घेणे सोपे झाले. यामुळे अन्याय्य व्याजदर आणि पैशाचे संशयास्पद स्रोत नष्ट झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com